अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह समारंभ नुकताच पार पडला. केवळ भारतातच नाही तर जगभरात या महागड्या लग्नाची चर्चा झाली. प्री वेडिंगपासून ते लग्नकार्यासाठी जवळपास 5 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, केवळ अंबानीच नाही तर अनेक भारतीय लग्नकार्यावर आपल्या उत्पन्नाचा मोठा वाटा खर्च करतात. विशेष म्हणजे शिक्षणापेक्षा लग्नावर दुप्पट खर्च करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे.
भारतात दरवर्षी जवळपास 80 लाख लग्न पार पडतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होताना दिसतो. भारतीय लग्न समारंभामध्ये हॉटेल बुकिंग, सजावट, केटरिंग, दागिने अशा विविध गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे लग्ग समारंभाचा परिणाम विविध क्षेत्रावर होताना दिसून येतो.
लग्न समारंभाचा भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा वाटा
भारतात दरवर्षी 80 लाख ते 1 कोटी लग्न होतात. तर अमेरिकेत हा आकडा 20-25 लाख एवढा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लग्न होत असल्याने अर्थव्यवस्थेतील वाटा देखील मोठा आहे. भारतीय वेडिंग इंडस्ट्री ही तब्बल 130 अब्ज डॉलर्सची (जवळपास 10 लाख कोटी) बाजारपेठ बनली आहे. हा आकडा अमेरिकेच्या तुलनेत दुप्पट आहे. तर चीनची अर्थव्यवस्था 170 अब्ज डॉलर एवढी आहे.
रिपोर्टनुसार, भारतीय लोक लग्नावर सरासरी 12.5 लाख रुपये खर्च करतात. हा आकडा शिक्षणावर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या दुप्पट आहे. प्रामुख्याने एप्रिल-जून आणि नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांमध्ये लग्न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
भारतीयांकडून लग्न कार्यावर 3 लाख रुपयांपासून ते 10 कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जातो. यात प्रामुख्याने लग्नावर 6 लाख ते 10 लाख रुपये खर्च करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
लग्नकार्यांमुळे अर्थव्यवस्थेला होतोय फायदा
रोजगार निर्मिती | भारतीयांकडून लग्न कार्यावर भरमसाठ पैसे खर्च केला जात असला तरीही यामुळे रोजगार निर्मिती होत असल्याचे दिसून येते. लग्न कार्यांमुळे विविध क्षेत्रात जवळपास 1 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. याद्वारे केटर्स, मेकअप आर्टिस्ट, लग्नाचे नियोजन करणारे, हॉटेल व्यावसायिकांना रोजगार प्राप्त होत आहे. |
हॉटेल व्यवसायाला फायदा | भारतात शाही व दिमाखदार लग्न सोहळा करण्याची हौस असते. यामुळे लग्नात येणाऱ्या पाहुण्यांचा आकडा देखील मोठा असतो. याचा सर्वाधिक फायदा हॉटेल व्यवसायांना होतो. लग्नाच्या हंगामात हॉटेल बुकिंगमध्ये मोठी वाढ होते. |
सोने-चांदी | भारतीयांकडून लग्न समारंभात सोने-चांदी खरेदी करण्यासाठीही सर्वाधिक खर्च केला जातो. लग्नातील कपडे, दागिने, सजावट इत्यादींवर लाखो रुपये खर्च केले जातात. रिपोर्टनुसार, सोने व दागिन्यांवर दरवर्षी 60 हजार कोटी रुपये खर्च केले जातात. तर लग्नाच्या एकूण खर्चापैकी 10 खर्च पोशाख, 20 टक्के खर्च केटरिंग आणि 15 टक्के खर्च हॉटेल/हॉट बुकिंग व होतो. |
पर्यटन व वाहतूक | लग्न समारंभामुळे पर्यटन व वाहतूक क्षेत्राला देखील चालना मिळते. डेस्टिनेशन वेडिंग, हनिमून यामुळे पर्यटनाला विशेष चालना मिळते. याशिवाय, साहित्य व प्रवाशांना घेऊन जावे लागत असल्याने वाहतूक क्षेत्राला देखील याचा फायदा होतो. |