तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोक शेअर बाजारातून परतावा कमविण्यासाठी एका अनुभवी व्यक्तीकडे आपले पैसे देतात. तो व्यक्ती त्याचा अनुभव आणि ज्ञान वापरून ते पैसे शेअर बाजारातील शेअर्स मध्ये गुंतवतो . त्यातून मिळणारा परतावा मग तो नफा असो की तोटा तो संपूर्ण आपला असतो. पण आपल्याला नफा कमवून देणाऱ्या म्युच्युअल फंड कंपन्यांना कुठून पैसे मिळतात हे माहित आहे का. हे पैसे कसे मिळतात हे पुढे पाहू.
कंपन्या नफा कसा मिळतो
सर्व मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या म्युच्युअल फंड चालवण्यासाठी खर्च करीत असतात आणि तो खर्च भागवण्यासाठी एकूण मालमत्तेच्या विशिष्ट टक्केवारीच्या प्रमाणात शुल्क आकारतात,आपण गुंतवणूक केलेल्या पैशांवर काही टक्के रक्कम ही आपल्या फंड मधून ठराविक कालावधी नंतर वजा केली जाते. तोच या कंपन्यांचा मूळ स्त्रोत असतो. ह्याला ' Expense ratio ' असं म्हणतात. उदाहरण स्वरूपात, समजा खर्च गुणोत्तराचे प्रमाण १ टक्का आहे आणि तुमची गुंतवणूक १०,००० रुपये आहे, तर तुम्ही कंपनीला परिचालन शुल्क म्हणून १०० रुपये देऊ लागता.
म्युच्युअल फंडात परतावा ठराविक नसतो. जसे की इन्शुरन्स मध्ये तुम्हाला सांगितले जाते की इतक्या वर्षानंतर इतकी ठराविक रक्कम मिळेल. पण म्युच्युअल फंडातील परतावा हा पूर्ण शेअर बाजारा वर अवलंबून असतो. समझा भरपूर चांगला परतावा मिळाला तर तो आपला असतो आणि दुसरी बाजू अशी की शेअर बाजार खालीच येत राहिला तर होणारा तोटा ही आपलाच अशा वेळी कंपनी हा उद्देश ठेवते की जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल. कारण जितका परतावा तुम्ही कमवाल तितक्या मोठ्या फंड वर काही टक्केवारी कंपनीला मिळेल.
तसेच इन्शुरन्स मध्ये तुम्ही काही वर्षे किंवा पूर्ण पॉलिसी चा पिरियड पर्यंत तुमची रक्कम काढू शकत नाही ! तेच म्युच्युअल फंड मध्ये १ वर्षानंतर पैसे काढता येतात. पण एक वर्षाच्या आत काढायचे असल्यास १% ' एक्झीट लोड ' हा गुंतवणूक केलेल्या रकमेमधून वजा केला जातो.
अशा प्रकारे म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांना आपला नफा करून घेत असतात.