Cultivation of Guar : शेतकरी दरवर्षी अनेक प्रकारचे पिकं आपल्या शेतात घेतात. त्यामध्ये कपाशी, सोयबिन, तूर, हरभरा, गहू, ज्वारी यांचा समावेश असतात. या सर्व पिकांना जास्त पाण्याची गरज असते. पावसाच्या पाण्यावर पिकांची लागवड केली जाते. अशी अनेक पिके आहेत जी शेतकऱ्यांचे नशीब बदलू शकतात. या पिकांचे व्यावसायिक महत्त्व जास्त असल्याने त्यांच्या किमती अधिक आहेत. गवार पीक हे देखील यातील एक आहे. गवार हे बिगर बागायत क्षेत्रातही घेता येते, त्याला पाणी कमी लागते. तर जाणून घेऊया, गवारची शेती कशी करू शकता, त्यातून किती उत्पन्न मिळवू शकता?
गवारची लागवड करण्यासाठी काय करावे?
जर तुम्ही गवारची लागवड करणार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला जमीन तयार करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला जमिनीची उन्हाळी हंगामात एक नांगरणी करावी. पावसाने, 1 ते 2 नांगरणी करून शेत तयार करावे लागेल. शक्य असल्यास शेणखताचा वापरही करावा लागेल. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल. नागरणी करतांना ती खोलवर होईल याची काळजी घ्यावी लागेल.
गवार पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते पण चिकणमाती पिकाच्या गुणवत्तेसाठी उपयुक्त ठरते. गवार हे कमी ते मध्यम पावसाच्या भागात पावसावर आधारित पीक आहे. गवारचे पीक क्षारयुक्त जमिनीत पिकवता येत नाही. गवार पिकाची पेरणी जूनचा शेवटचा आठवडा किंवा जुलैचा पहिला पंधरवडा या काळात केली जाते.
पिकाला कीड लागल्यास नियंत्रण कसे ठेवावे?
गवार पिकात अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. यातील तेला किंवा जेसीड, पांढरी माशी आणि चेपा हे प्रमुख आहेत. त्यांच्या नियंत्रणासाठी मिथिल डायमेटॉन 25 ईसी 250 मिली प्रति बिघा या प्रमाणात फवारावे. दुसरीकडे, जिवाणूजन्य आजारासाठी 30 ग्रॅम ऍग्रोमायसिन पाण्यात मिसळून फवारावे. जळजळीच्या रोगासाठी सल्फर पावडर शिंपडू शकता.
गवार गम उद्योग उभा करून चांगली कमाई करू शकता
गवार हे औद्योगिक पीक आहे यातून डिंक म्हणजेच गम मिळतो. त्यातून अनेक प्रॉडक्ट तयार करता येतात. सुती कापड, कागद तयार करणे, सौंदर्यप्रसाधने, औषधे इत्यादींच्या निर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. गवार गम उद्योग उभारून शेतकरी किंवा इतर लोक वर्षाला लाखो रुपये कमवू शकतात. भारतीय देसी गवारला अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मोठी मागणी आहे.
गवार गम बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गवार बियाणे आवश्यक आहे. गवार गम बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गवार सोलणे आणि खडे आणि माती वेगळे करणे इत्यादि गोष्टी आहेत. त्यानंतर त्यावर अनेक प्रक्रिया करून गवार गम तयार केला जातो.