Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budgeting Apps: मासिक खर्चाचा ताळमेळ बसवण्यात बजेटिंग अ‍ॅप्स कसे मदत करतात?

budgeting apps

Image Source : vocal.media

बऱ्याच वेळा छोटेमोठे खर्च कुठे होतात याकडे आपण लक्ष देत नाही. मात्र, महिन्याभराचा विचार केला तर लक्षात येते की गरज नसलेल्या गोष्टींवरही हजारो रुपये खर्च झाले. आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च कोणते यावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी बजेटिंग अ‍ॅप्स तुमची मदत करू शकतात.

Budgeting Apps to Manage Money: डिजिटल बँकिंगमुळे पेमेंट करणं अगदी सोपं झाले आहे. एका क्लिकवर क्यूआर कोड स्कॅन करून दरदिवशी कोट्यवधी भारतीय व्यवहार करतात. मात्र, डिजिटल पेमेंटमुळे अनावश्यक खर्चाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे खर्चावर आवर घालण्यासाठी नक्की कुठे खर्च जास्त होतो हे समजायला हवे.

बऱ्याच वेळा छोटेमोठे खर्च कुठे होत आहेत याकडे आपण लक्ष देत नाही. मात्र, महिन्याभराचा विचार केला तर लक्षात येते की गरज नसलेल्या गोष्टींवरही हजारो रुपये खर्च झाले. असे आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च कोणते यावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी बजेटिंग अ‍ॅप्स तुमची मदत करू शकतात.

बजेट अ‍ॅप्स कोणत्या गोष्टींसाठी मदत करतात?

सर्व बँकांमधील एकूण रक्कम, गुंतवणूक, बचत, महिन्याचे वीज, घरभाडे, मोबाइल सह सर्व प्रकारचे रिचार्ज, त्यांचे अलर्ट तुम्हाला बजेटिंग अॅप्सद्वारे सेट करता येतील. महिन्याच्या शेवटी तुम्ही संपूर्ण आवक आणि जावक याचा रिपोर्ट जनरेट करू शकता. त्यामुळे नक्की कोणत्या गोष्टीवर किती खर्च झाला हे लक्षात येईल. कोणत्या गोष्टींना आवर घालण्याची गरज आहे, हे सुद्धा समजेल.  

आर्थिक ध्येय ठरवू शकता?

बजेटिंग अ‍ॅपद्वारे तुम्ही अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे ध्येय ठरवू शकता. कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा याचे टार्गेट सेट करू शकतात. तसेच घरभाडे, विविध बिल्स अ‍ॅड करू शकता. प्रत्येक महिन्यात किती रक्कम बचत, गुंतवणूक करायची याचे ध्येय ठरवू शकता. सहा, महिने, वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ध्येय ठरवू शकता. तुमच्यापुढे काही ध्येय असेल तर तुम्ही शिस्तीने बचत करण्याची शक्यता जास्त असते.   

खर्चाच्या कॅटेगरी तयार करू शकता

बजेटिंग अ‍ॅपमध्ये तुम्ही खर्चाच्या विविध कॅटेगरी तयार करू शकता. निश्चित खर्च, बदलते खर्च, गरजा आणि इच्छा, बिल असलेले खर्च, बिल नसलेले खर्च. तसेच किराणा, प्रवास, मनोरंजन, फूड अशा कॅटेगरीही तुम्ही करू शकता. त्यामुळे कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च झाला या अचूक अंदाज येईल. त्यानुसार तुम्ही पुढील महिन्यापासून खर्च कमी जास्त करू शकाल. 

बिल्स अलर्ट 

काही बजेटिंग अ‍ॅप्स तुम्हाला EMI आणि क्रेडिट कार्ड पेमेंटचे अलर्ट देतात. त्यामुळे तुम्हाला बिल पेमेंट लक्षात किंवा कोठेही लिहून ठेवण्याची गरज नाही. दर महिन्याला करावे लागणारे पेमेंट तुम्ही ऑटोमेट करू शकता. ठराविक तारखेला ऑटोमॅटिक ते पेमेंट केले जाईल.