Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mamaearth, BBlunt सारखे ब्रॅण्ड बनवणारी Honasa कंपनी 2023 मध्ये आणणार IPO!

Honasa  IPO

ब्युटी, बेबीकेअर आणि स्किनकेअर विभागातील झपाट्याने वाढणारी Honasa फर्मची 2016 मध्ये वरुण आणि 'शार्क टँक' फेम गझल अलघ या जोडप्याने स्थापना केली होती. या कंपनीला 2022 मधील पहिल्या युनिकॉर्न कंपनीचा मान मिळाला होता.

Honasa Consumer Private Ltd, 2022 मधील पहिली युनिकॉर्न कंपनी जिने Mamaearth, The Derma Co आणि BBlunt सारख्या ब्रँडची स्थापना केली. या कंपनीने फ्रेश इश्यू आणि ऑफर-फॉर-सेल अशा दोन्ही माध्यमातून पैसे गोळा करण्यासाठी सेबीकडे आयपीओ (Initial Public Offering)साठी ड्राफ्ट पेपर्स जमा केले आहेत. ब्युटी, बेबीकेअर आणि स्किनकेअर विभागातील झपाट्याने वाढणारी D2C (डायरेक्ट टू कस्टमर म्हणजे थेट ग्राहकांसाठी) फर्मची 2016 मध्ये वरुण आणि 'शार्क टँक' फेम गझल अलघ या जोडप्याने स्थापना केली होती. जानेवारीमध्ये कंपनीने VC फर्म Sequoia Capital च्या नेतृत्वाखाली निधी उभारणी फेरीत 1.2 बिलियन डॉलरच्या मूल्यावर 52 मिलियन डॉलर्स उभे केले होते. त्यामुळे या कंपनीला 2022 मधील पहिल्या युनिकॉर्न कंपनीचा मान मिळाला होता.

कंपनीच्या फ्रेश इश्यू शेअर्सचा आकार 400 कोटी रुपयांपर्यंत आहे आणि बाह्य गुंतवणूकदार आणि वैयक्तिक भागधारकांच्या मदतीने 46,819,635 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale-OFS)साठी ठेवण्यात आले आहेत. सोफिना व्हेंचर्स एसए, इव्हॉलन्स, फायरसाईड व्हेंचर्स, स्टेलारिस व्हेंचर पार्टनर्स, स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा, ऋषभ हर्ष मारीवाला आणि रोहित कुमार बन्सल हे शेअरहोल्डर्स आयपीच्या माध्यमातून आपले शेअर्स कमी करणार आहेत.

होन्साच्या IPO चा एकत्रित आकार 2,400 ते 3,000 रुपये कोटी यादरम्यान असू शकतो, नवीन वर्षात म्हणजे 2023 मध्ये मार्च महिन्यात IPO ओपन होण्याची शक्यता आहे. आयपीओतून मिळणारा निधा हा जाहिरातींच्या खर्चासाठी, ब्रँड इमेज करण्याकरीता, नवीन आऊटलेटची स्थापना करण्याकरीता, नवीन सलोन उभारण्यासाठी आणि एकूणच कंपनीची कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.

SEBI कडे Mamaearthची फाईल अमन गुप्ता आणि समीर मेहता यांच्या बोट (boAt) कंपनीच्या मागोमाग येत आहे. इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडची निर्मिती करणारी boAt कंपनी आयपीओच्या माध्यमातून सुमारे 2 हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल (Kotak Mahindra Capital), जेएम फायनान्शियल (J M Financial), सिटी आणि जेपी मॉर्गन (Citi and J P Morgan) या आयपीओवर काम करणाऱ्या गुंतवणूक बँका आहेत आणि सिरिल अमरचंद मंगलदास, इंड्स लॉ आणि खेतान अण्ड कंपनी कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहणार आहे. 

होनासा कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड

'टॉक्सिन फ्री' उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसाठी लोकप्रिय असलेल्या Honasa कंझ्युमरने गेल्या 12-15 महिन्यांत तीन बाय-आऊट्ससह मार्केटमध्ये उडी मारली. प्रथम, त्यांनी महिलांसाठी प्लॅटफॉर्म असलेले Momspresso आणि त्यानंतर गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडकडून BBlunt या दोन कंपन्या विकत घेतल्या आणि नंतर स्किनकेअर ब्रँड डॉ. शेठ्स विकत घेऊन आपला उत्पादन मार्केटमधील पोर्टफोलिओ मजबूत केला. त्यानंतर लिक्विड लिपस्टिक, बुलेट लिपस्टिक, काजल आणि लिप बाम यासारखी उत्पादने मार्केटमध्ये आणून ऑक्टोबर, 2021 मध्ये त्यांनी कलर कॉस्मेटिक्स श्रेणीत प्रवेश केला होता. 

एका महिन्यानंतर, फर्मने नवीन हायड्रेशन आधारित स्किनकेअर ब्रँड Aqualogica लॉन्च केले. ब्युटी आणि स्किन केअर विभागात होनासासोबत स्पर्धा करणाऱ्या  इतर खेळाडूंमध्ये लिस्टेड कंपन्या जसे की, नायका, पर्पल, द गुड ग्लॅम ग्रुप आणि शुगर कॉस्मेटिक्स यांचा समावेश आहे. Nykaa ने 2021 मध्ये शेअर बाजारात बंपर पदार्पण केले होते. पण नायकाच्या शेअरची किंमत घसरली आहे; ती अद्याप रिकव्हर झालेली नाही.

मनीकंट्रोलने नोव्हेंबर महिन्यात दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, Honansa चे आर्थिक वर्ष 2022 मध्ये भरपूर नफ्यात असल्याचे दिसून आले. त्यांना जवळपास 20 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीच्या महसुलातही 102 टक्क्यांनी वाढ होऊन ती 952 कोटी रुपयांवर गेली. 2022 मध्ये कंपनीने जाहिरातींवर 391 कोटी रुपये खर्च केले, तर त्याच्या साहित्याचा खर्च आणि कर्मचारी फायद्याचा खर्च अनुक्रमे 281 कोटी रुपये आणि जवळपास 79 कोटी रुपये झाला होता.