Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील मम्माअर्थ कंपनी 2023 मध्ये 30 कोटी डॉलरचा आयपीओ आणण्याच्या तयारीत

IPO INVESTMENT mamaearth product

भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरणीचे वातावरण आहे; भारतातील स्टार्टअप उद्योगांमध्ये महागाईमुळे मंदीचे वातावरण आहे. अशावेळी ‘मम्माअर्थ’चा (Mamaearth) आयपीओ (Initial Public Offering-IPO) येणार असल्याची बातमी भारतीय शेअर मार्केटसाठी शुभवार्ता ठरू शकण्याची शक्यता आहे.

सिक्युया (Sequoia) कंपनीची गुंतवणूक असलेल्या भारतीय स्कीन केअर स्टार्टअप कंपनी मम्माअर्थ (Mamaearth) शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होण्याच्या तयारीत आहे. मम्माअर्थ कंपनी येणाऱ्या वर्षात 30 कोटी डॉलरचा आयपीओ (Initial Public Offering-IPO) घेऊन येण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या आपीओचे व्हॅल्युऐशन 3 अब्ज डॉलर ठेवणार असल्याची माहिती आहे.

'मम्माअर्थ'ची स्थापना 2016 मध्ये झाली होती. ही कंपनी टॉक्सिन-फ्री उत्पादनांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. कंपनी फेस वॉश, शॅम्पू, हेअर ऑईल आदी उत्पादनांची निर्मिती करते. या कंपनीची हिंदुस्थान युनीलिव्हर (Hindustan Unilever) आणि प्रोक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल (Procter & Gamble)या सारख्या कंपन्यांशी स्पर्धा आहे. 2022 च्या सुरूवातीला जानेवारीमध्ये कंपनीने सिक्युया (Sequoia) आणि बेल्जिअममधील सोफिना (Sofina) आदी कंपन्यांकडून 1.2 अब्ज डॉलर मदत घेतली होती. या फंडसाठी कंपनीने कंपनीचे व्हॅल्युयेशन 1.2 अब्ज डॉलर ठेवले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी आता आपल्या प्रस्तावित आयपीओसाठी 3 अब्ज डॉलरचे भांडवली मूल्य ठेवणार आहे. 2022 च्या अखेरपर्यंत कंपनी सेबीकडे (SEBI) आयपीओसाठी नामांकन दाखल करण्याची शक्यता आहे.

मम्माअर्थ कंपनी या आयपीओद्वारे सुरूवातील कमीतकमी 30 कोटी डॉलरचा व्हॉल्यूम ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. तर काही अभ्यासकांनी हा आयपीओ 35 कोटी डॉलर इतका असू शकतो असे म्हटले आहे. वरूण अलघ आणि गजल अलघ या दोघांनी 2016 मध्ये मम्माअर्थ कंपनीची स्थापना केली होती. वरूण अलघ यांनी हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL) कंपनीसोबत काम केले आहे.

कंपनीच्या अधिकृत प्रवक्त्यांनी या प्रस्तावित आयपीओबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे. पण कंपनी आपल्या आयपीओसाठी जेपी मॉर्गन चेस (JP Morgan Chase), जे एम फाननान्शिअल (JM Financial) आणि कोटक महिंद्रा कॅपिटल (Kotak Mahindra Capital) या कंपन्यांसोबत लीड मॅनेजर म्हणून काम करण्याबाबत बोलणी सुरू केली आहे.

शेअर मार्केटमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते.

Image Source - mamaearth.in