Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan Strategy: पहिल्यांदाच होम लोन घेणार असाल तर या सहा स्ट्रॅटजी नक्की फॉलो करा, होईल फायदा

Home Loan Strategy: पहिल्यांदाच होम लोन घेणार असाल तर या सहा स्ट्रॅटजी नक्की फॉलो करा, होईल फायदा

Image Source : www.dbhfinance.com

Home Loan Strategy: दीर्घ कालावधी, कर्जाची मोठी रक्कम आणि जास्त डाऊन पेमेंट यामुळे होम लोन उपलब्ध करून घेण्यासाठी कर्जासाठी अर्ज करणाऱ्याला आर्थिकदृष्ट्या सज्ज असावे लागते. पहिल्यांदाच होम लोनसाठी अर्ज करणाऱ्यांनी त्यांची होम लोन पात्रता वाढवण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

कर्जदाते अर्जदाराचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, परतफेडीची क्षमता आदी निकषांवर लोन मंजूर करतात. कर्जदात्यांनी निश्चित केलेले निकष पूर्ण करण्यात अपयश आल्यास लोन नाकारले जाण्याची शक्यता असते. दीर्घ कालावधी, कर्जाची मोठी रक्कम आणि जास्त डाऊन पेमेंट यामुळे होम लोन उपलब्ध करून घेण्यासाठी कर्जासाठी अर्ज करणाऱ्याला आर्थिकदृष्ट्या सज्ज असावे लागते. पहिल्यांदाच होम लोनसाठी अर्ज करणाऱ्यांनी त्यांची होम लोन पात्रता वाढवण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट स्कोअर तपासून बघा

होम लोनच्या अर्जाचे मूल्यमापन करताना कर्जदात्यांद्वारे लावल्या जाणाऱ्या पहिल्या काही चाळण्यांमध्ये क्रेडिट स्कोअरचा समावेश होतो. 750  किंवा त्याहून अधिक चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर होम लोन मंजूर होण्याच्या संधी वाढतात आणि व्याजदरही तुलनेने कमी लावले जातात. म्हणूनच होम लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने प्रथम आपला क्रेडिट स्कोअर तपासून बघितला पाहिजे.  

डाउन पेमेंटचा हिस्सा वाढवा

कर्जदात्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या किमतीला एलटीव्ही रेशो असे म्हणतात. मालमत्तेची उर्वरित किंमत खरेदी करणाऱ्याला त्याच्या/तिच्या स्वत:च्या स्रोतांमधून डाउन पेमेंट किंवा मार्जिन काँट्रिब्युशनच्या स्वरूपात चुकती करावी लागते. कर्जाच्या अर्जासाठीचा अंतिम एलटीव्ही रेशो हा कर्जदात्याने केलेल्या अर्जदाराच्या पत जोखीम मूल्यांकनावर अवलंबून असतो. म्हणूनच अर्जदाराने मालमत्तेच्या किमतीच्या किमान 10% ते 25% रक्कम जमवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, जेणेकरून लोनचे डाउन पेमेंट किंवा मार्जिन काँट्रिब्युशन करण्यासाठी तो/ती आर्थिकदृष्ट्या सज्ज राहू शकेल.अधिक डाउन पेमेंटमुळे कर्जदात्यासाठी पतजोखीम कमी होत असल्याने, अधिक डाउन पेमेंट करणाऱ्या होम लोन अर्जदाराचे लोन मंजूर होण्याची शक्यता अधिक असते.  

EMI परवडण्याजोगा आहे की नाही हे तपासा

होम लोन पुरवणारे कर्जासाठी आलेल्या अर्जांचे मूल्यमापन करताना होम लोन अर्जदाराची परतफेडीची क्षमता विचारात घेतात. ज्या अर्जदाराचे ईएमआयपोटी असलेले एकूण दायित्व (यामध्ये नवीन होम लोनच्या हप्त्याचाही समावेश होतो) त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 50-60% पर्यंत आहे, त्याला/तिला प्राधान्याने लोन दिले जाते. ही मर्यादा ओलांडणाऱ्यांचे लोन मंजूर होण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच ही मर्यादा ओलांडणाऱ्या अर्जदारांनी त्यांची लोन परतफेड दायित्वे कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  

आपत्कालीन निधीमध्ये होम लोन हप्त्यांचा समावेश करा

आकस्मिक आर्थिक संकट किंवा नोकरी जाणे, आजार, विकलांगता यांमुळे उत्पन्न बंद होणे यांमुळे एखाद्याच्या लोन परतफेड क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. लोनचे ईएमआय वेळेवर चुकते केले नाहीत, तर जबर दंड बसू शकतो तसेच क्रेडिट स्कोअरही कमी होऊ शकतो. एखाद्यावर लोनचे ईएमआय भरण्यासाठी गुंतवणुका मोडण्याचीही वेळ येऊ शकते आणि यामुळे दीर्घकालीन आर्थिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आपल्या आपत्कालीन निधीमध्ये 6 महिन्यांतील अपेक्षित ईएमआयचा समावेश करणे अत्यावश्यक आहे.

इतर होम लोन्सची तुलना करा

होम लोन देणाऱ्या बँका आणि हाऊसिंग कंपन्यांचे व्याजदर, प्रक्रिया शुल्क, कर्जाची मुदत व अन्य दर होम लोन अर्जदारांच्या पत जोखीम मूल्यमापनानुसार वेगवेगळे असू शकते. म्हणूनच होम लोनसाठी अर्ज करणाऱ्यांनी एका विशिष्ट कर्जदात्याची निवड करण्यापूर्वी शक्य तेवढ्या कर्जदात्यांच्या प्रस्तावांची तुलना केली पाहिजे. कर्जदाते पूर्वीपासूनच्या ग्राहकांना प्राधान्याचे दर किंवा वेगळे नियम व अटी देऊ करू शकतात, त्यामुळे संभाव्य कर्जदारांनी त्यांची आधीची कर्जे ज्यांच्याकडून घेतली आहेत किंवा ज्यांच्याकडे ठेवी आहेत, अशा वित्तीय संस्थांशीच प्रथम संपर्क साधावा. 

कर्जपात्रता वाढवण्यासाठी सहअर्जदाराला सोबत घ्या

अपुरे उत्पन्न, कमी क्रेडिट स्कोअर, एकूण ईएमआय दायित्व अधिक असणे ही होम लोन नाकारली जाण्याची काही प्रमुख कारणे आहेत. अर्जदार कुटुंबातील कमावत्या सदस्याला (किंवा सदस्यांना) सहअर्जदार म्हणून घेऊन लोन मंजूर होण्याची शक्यता वाढवू शकतो. स्थिर उत्पन्न व उत्तम क्रेडिट स्कोअर असलेल्या कुटुंबातील व्यक्ती सहअर्जदार होऊ शकतात. सहअर्जदार घेतल्यास अधिक मोठ्या रकमेच्या कर्जासाठी अर्जदार प्राप्त ठरू शकतो. स्त्री सहअर्जदार घेतल्यास काही कर्जदात्यांकडून व्याजदरामध्ये अतिरिक्त 0.05% सलवत मिळू शकते.