Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Currency : भारतीय नाणी आणि नोटांची गोष्ट

मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का? नोटांचा शोध कधी लागला? मध्यवर्ती बँकेची(RBI) स्थापना कधी झाली? आधीच्या काळात नोटांवर कोणाचा फोटो किंवा कोणाचे चित्र असायचे आणि आता कोणाचे आहे हे आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

भारतीय रुपयाचा (Indian rupee) जन्म कधी आणि कसा झाला तुम्हाला माहीत आहे का? एकेकाळी व्यवहार 'एक हाथसे दो, एक हाथसे लो (Barter Exchange) तत्त्वावर होत होतो. म्हणजे एखाद्या वस्तूच्या बदल्यात तुम्ही दुसरी वस्तू त्या माणसाला द्यायची. पण, यामध्ये वस्तूचं मूल्य निर्धारित (Devaluation) करण्याची कुठलीही यंत्रणा नव्हती. म्हणूनच जन्म झाला मूल्य निश्चित केलेल्या नाण्यांचा. आणि हळू हळू कमी खर्चात्या नोटांची निर्मिती झाली. 

भारतीय नाण्यांच्या जन्माची गोष्ट

भारतीय नाण्यांचा जन्म इ.स.पूर्व 6 व्या शतकात झाला असे मानले जाते. काशी, मगद, गांधार, पांचाळ, कलिंग या राजवटींनी सर्वप्रथम नाणी पाडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील इ.स. 1674 मध्ये सोन्याची होन आणि शिवराई ही नाणी चलनात आणली. 1764-65 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपनीने मुघल बादशहा आलमची नाणी बनविण्यास सुरवात केली. मात्र त्यावेळी ही नाणी हाताने तयार केली जात असल्याने कधीच एकसारखी बनली जात नव्हती. यामुळेच कंपनीने 1780 मध्ये मशीनीने नाणी बनवण्यास सुरुवात केली. भारतामधील गोल, सुबक एकसारख्या वजनाची नाणी बनवण्याचा मान ‘जेम्स प्रिन्सेप'(JEMS PRINCEP) यांना दिला जातो.

भारतातील पहिली छापील कागदी नोट आणि ‘विक्टोरिया पोर्ट्रेट सिरीज’

ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच करन्सी ऍक्टनुसार 1861 साली भारतात कागदी नोट छापण्यास सुरवात केली. या नोटा बँक ऑफ इंडिया, द बंगाल बँक आणि बँक ऑफ हिंदुस्थान यांच्या मदतीने देवनागरी लिपीमध्ये छापण्यात आल्या. या नोटांमध्ये राणी विक्टोरियाचा फोटो छापण्यात आला व तशी एक मालिका बनविण्यात आली त्यालाच ‘विक्टोरिया पोर्ट्रेट सिरीज’ असं म्हणतात. या मालिकेमध्ये 5, 10, 20, 50, 100, आणि 1000 या प्रकारांमध्ये नोटा छापल्या गेल्या.

रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेनंतरचे बदल

 सर्वप्रथम RBI ने 10,000 रुपयांची नोट काढली होती आणि ती 1947 पर्यंत म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळे पर्यंत चलनात होती. त्यानंतर 1930 मध्ये नोटांवर जॉर्ज पाचवा आणि जॉर्ज सहावा यांचे फोटो छापण्यात आले. 1938 मध्ये RBI मार्फत 5 रुपयांची नोट छापली गेली. यावर देखील राजा जॉर्ज यांचाच फोटो होता.

स्वातंत्र्यानंतर नोटांमधील बदल

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाणी आणि नोटांमध्ये थोडा बदल करून एका बाजूने सहावे जॉर्ज यांची भाव मुद्रा तशीच ठेवण्यात आली. तर दुसऱ्या बाजूस भारताचे प्रतिक म्हणून सिंहाचे चित्र छापण्यात आले. त्यानंतरच्या नोटांमध्ये हळूहळू बदल करत सहावे जॉर्ज यांच्या जागी अशोक स्तंभ आणि सिंहाचे चित्र छापण्यात आले. 1950 नंतर पूर्णपणे भारतीय नाणी छापण्यास सुरवात करण्यात आली व चार दिशांना पाहणाऱ्या सिंहाचे मानचित्र छापण्यास सुरवात झाली.

भारतीय नोटांवर महात्मा गांधीचा फोटो

1970 मध्ये महात्मा गांधीजींचे शताब्दी स्मारक म्हणून 500 रुपयांची खास नोट काढली गेली. त्यांनतर 1996 पासून महात्मा गांधींचा फोटो वापरून नोटांची मालिका काढण्यात आली. महात्मा गांधींना भारतीय रुपयाच्या मुख्य चेहरा म्हणून स्वीकारण्यात आले म्हणूनच आजतागायत नोटांवर गांधीजींचा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे.

नोट आणि नोटबंदीनंतरचे बदल

2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद झाल्या आणि त्याऐवजी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. 1000 रुपयाच्या नोटांची जागा 2000रुपयांच्या नोटांनी घेतली हा मोठा बदल ‘नोटबंदी’ म्हणून ओळखला जाऊ लागला. आता भारतात 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयाच्या नोटांची चलती आहे.