उन्हाळा वाढतोय! मुंबईतील लोक शहराजवळ कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी शॉर्टट्रीप करण्याच्या विचारात असतात. ट्रीप म्हटले की अनेकांना यावेळी खर्चाची चिंता असते. आम्ही या लेखाच्या माध्यमातून अशी काही ठिकाणे सुचवणार आहोत जेथे अगदी मोजक्या खर्चात तुम्ही एक ट्रीप करू शकता. शहरापासून जवळ असल्यामुळे इथे जाण्यासाठी अनेक सार्वजनिक वाहतुकीची साधने अतिशय अल्प दरात उपलब्ध यामुळे संपूर्ण कुटुंबासह एक रंजक शॉर्टट्रीप तुम्हाला करता येईल.
इगतपुरी हिल (Igatpuri Hill)
इगतपुरी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या या हिल स्टेशनमध्ये तुम्हाला अनेक धबधबे, इगतपुरी किल्ला, मंदिरे आणि धरणे पाहायला मिळतील. इगतपुरीपासून जवळ कसारा हे रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही खाजगी किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापार करून येथे पोहोचू शकता.
लोणावळा (Lonavla)
लोणावळा मुंबईपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे, जे खूप सुंदर दिसते. नैसर्गिक हिरवाईने नटलेले धबधबे येथील सौंदर्यात भर घालतात. शहरातील अनेक लोक शॉर्टट्रीपसाठी लोणावळा पसंत करतात. यामुळे उष्ण कालावधीत लोणावळा येथे पर्यटकांची मोठी रेलचेल असते. गेल्या काही वर्षात लोणावळा येथील पर्यटन विकसित झाल्यामुळे लोणावळा हे उष्ण काळात महाराष्ट्रातील पर्यटनाचे केंद्रबिंदू झाले आहे.
खंडाळा (Khandala)
लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर खंडाळा आहे. जिथे तुम्हाला नयनरम्य दृश्य, हिरवळ आणि सुंदर दरी पाहायला मिळेल. इथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात मराठी खाण्यापिण्याचा आस्वाद घेता येईल.
माथेरान टेकडी (Matheran Hill)
मुंबईपासून सुमारे 85 किमी अंतरावर, तुम्ही माथेरान हिल स्टेशनला देखील भेट देऊ शकता. आशियातील हे एकमेव ऑटोमोबाईल फ्री डेस्टिनेशन आहे. येथील निसर्गसौंदर्य तुम्हाला आनंद देईल.
माळशेज घाट (Malshej Ghat)
मुंबईपासून 125 किमी अंतरावर माळशेज घाट आहे, जो बाईकर्सचे आवडते ठिकाण आहे. इथे पावसाळा ऋतू दरम्यान तुम्हाला सुंदर धबधबे पाहायला मिळतील. इथून थोड्या अंतरावर एक धरणही बघायला मिळेल.