सॅलरी म्हटले की, ती किती आहे? हा प्रश्न सर्वसामान्य आहे. मात्र, प्रत्येकजण ती आहे तेवढीच सांगेल की नाही याची शक्यता कमी असते. पण, ती जाणून घेणे हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असतो. एका प्रायव्हेट रिपोर्टनुसार, बॅंकींग क्षेत्रात भारतात सर्वाधिक सॅलरी घेणाऱ्यांच्या यादीमध्ये HDFC बॅंकेचे CEO शशीधर जगदीशन यांनी पहिला आणि HDFC बॅंकेचे DM कैझाद भरूचा यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यादीत Axis Bank बॅंकेचे CEO अमिताभ चौधरी, ICICI बॅंकेचे संदिप बक्षी यांचाही वर्णी लागली आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे CEO उदय कोटक यांनी यावर्षीही अवघा 1 रुपया सॅलरी घेण्याचे ठरवले आहे.
Bank CEO घेतात कोट्यवधींची सॅलरी
HDFC बॅंकेचे CEO शशीधर जगदीशन यांना 2022-23 या आर्थिक वर्षात सर्वांत जास्त सॅलरी मिळाली आहे. या यादीत 10.55 कोटी रुपये वार्षिक सॅलरीसह ते अव्वल स्थानी आहेत. दुसरा क्रमांक त्यांचेच सहकारी कैझाद भरूचा यांचा आहे. त्यांना या आर्थिक वर्षात वेतनापोटी 10 कोटी मिळाले आहेत. पण, बॅंकेच्या CEO मध्ये दुसरा क्रमांक अॅक्सिस बॅंकेचे (Axis Bank) अमिताभ चौधरी यांचा आहे. त्यांना 9.75 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. त्यांनतर आयसीआयसीआय बॅंकेचे(ICICI Bank CEO) संदिप बक्षी यांना ही अमिताभ चौधरी यांच्या खालोखाल म्हणजेच 9.60 कोटी रुपये मिळाले आहेत. याचबरोबर, कोटक महिंद्रा बॅंकेत जवळपास 26% भागीदारी असलेल्या उदय कोटक यांनी या आर्थिक वर्षातही सॅलरी म्हणून 1 रुपया घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत वाढ
बॅंकींग क्षेत्रात नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले असून कोटक महिंद्रा बॅंकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत 16.97% वाढ केली आहे. तर ICICI बॅंकेने कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत 11% वाढ केली आहे. याचबरोबर, Axis बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या महागाई दरात सरासरी 7.6% वाढ झाली. यामध्ये HDFC बॅंकेनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत सरासरी 2.51% वाढ केली आहे. विशेष म्हणजे फेडरल बॅंक जिचा कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा दर सर्वांत कमी आहे, त्यांनी फक्त 2.67% सॅलरीमध्ये वाढ केली आहे.
जगदीशन यांचे पॅकेज
जगदीशन यांना 10. 55 कोटीचे पॅकेज मिळाले आहे. यामध्ये त्यांची बेसिक सॅलरी 2.82 कोटी रुपये आहे, 3.31 कोटींच्या भत्त्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच, 33.92 लाखाचा पीएफ आणि 3.63 कोटी रुपयांच्या परफाॅर्मन्स बोनसचाही यात भरणा आहे. असे त्यांच्या पॅकेजचे स्वरूप असून या आर्थिक वर्षांत सॅलरीच्या बाबतीत त्यांनी बाजी मारली आहे. तर 2021-22 मध्ये त्यांना 6.51 कोटींचे पॅकेज होते. पण, पॅकेजची वाढ टक्क्यांनुसार पाहिल्यास जगदीशन यांची सॅलरी 2022-23 या आर्थिक वर्षात 62 टक्क्यांनी वाढली आहे.