Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI bonds: मुदत ठेवीपेक्षा जास्त परतावा, गुंतवणूक करण्यापूर्वी बाँडशी संबंधित 'या' काही खास गोष्टी

RBI bonds: मुदत ठेवीपेक्षा जास्त परतावा, गुंतवणूक करण्यापूर्वी बाँडशी संबंधित 'या' काही खास गोष्टी

RBI bonds: चांगल्या व्याजदरासह कमीतकमी जोखीम असावी, या उद्देशानं गुंतवणूकदार चांगली योजना शोधत असतो. त्यात आता चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. अनेक एफडी आणि बचत योजना गुंतवणूकदारांना चांगला व्याज दर देत आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे रोखेही (Bonds) गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले आहेत.

आरबीआय (Reserve Bank of India) फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड्सवरचा (Taxable) व्याज दर पहिल्यांदाच 8 टक्क्यांच्या वर गेला आहे. त्यामुळे सध्याच्या एफडीपेक्षा (Fixed deposit) हा दर निश्चितच चांगला आहे. जर रोख्यांच्या या पर्यायात तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यापूर्वी त्याच्याशी काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.

व्याज दर किती?

सध्या या बाँडवर 8.5 टक्के व्याजदर दिला जात आहे. सरकार वर्षातून दोनदा व्याजदराचा आढावा घेतं. म्हणजेच रोख्यांचे व्याजदर बदलत राहतात. या रोख्यांवरचं व्याज वर्षातून दोनदा 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी भरावं लागतं. व्याजाची गणना ही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या आधारे केली जात असते.

एनएससीचे दर

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर दिलेल्या व्याजापेक्षा बॉण्डवर 0.35 टक्के जास्त व्याज मिळतं. तर, जर एनएससीचे दर वाढले, तर रोख्यांचे दर वाढतील आणि एनएससीचे दर कमी झाले तर बाँडचे दर कमी होणार आहेत. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचे दर 7.7 टक्के इतके निश्चित करण्यात आले आहेत.

बाँडच्या अटी काय?

बाँडचा कालावधी 7 वर्षांचा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लॉकइन कालावधी देण्यात आला आहे. 60 ते 70 वर्षे वयोगटातल्या गुंतवणूकदारांसाठी लॉकइन 6 वर्षे, 70 ते 80 वर्षे वयोगटातल्यांसाठी लॉक-इन 5 वर्षे आणि 80 वर्षांवरच्या गुंतवणूकदारांसाठी लॉकइन कालावधी 4 वर्षे आहे.

बाँडवरचं व्याज करपात्र

बाँडवर मिळणारं व्याज कराच्या कक्षेत येतं. 1000 रुपयांच्या बॉण्डमध्ये गुंतवणूक करता येवू शकते. कमाल गुंतवणुकीची यात मर्यादा नाही. या रोख्यांवर तुम्ही कर्ज घेऊ शकत नाही. रिझर्व्ह बँक रोखे जारी करते, म्हणूनच ते सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये गणले जातात. रोखे केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी केले जात आहेत.

एफडीपेक्षा चांगला परतावा

गुंतवणुकीचा हा पर्याय चांगला परतावा देतो. व्याजदर एनएससीशी जोडलेले असल्यानं तुम्हाला अधिक चांगल्या व्याजाची अपेक्षा करता येवू शकते. सध्याच्या व्याजदरांवर रोखे परतावा एफडी परताव्यापेक्षा चांगला आहे. आपण 5 वर्षांच्या कालावधीसाठी जर व्याजदर पाहिले तर एसबीआय 6.5 टक्के, एचडीएफसी 7 टक्के आणि आयसीआयसीआय बँक 7 टक्के व्याज देत आहे.