Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Most Selling Bike: देशात सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल, जाणून घ्या किंमत आणि मायलेज

Hero Splendour

Most Selling Bike: भारतात सर्वाधिक विकल्या जाणारी मोटरसायकल Hero Splendor Plus आणि Hero Super Splendor मध्ये अनेक मॉडेल्स आहेत आणि या सर्व दुचाकी गाड्यांची किंमत 72,076 रुपयांपासून सुरू होते. Hero Splendor गाडीला कंपनीने काळानुसार कंपनीने अपग्रेड केले आहे. या गाडीचे विविध मॉडेल्स व मायलेज याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Hero Splendor Plus and Super Splendor Price: जेव्हा कमी किंमत व चांगला मायलेज असलेल्या मोटरसायकलची चर्चा होते तेव्हा लोकांच्या ओठावर पहिले नाव येते  Hero Splendor. Hero MotoCorp कंपनीची ही  बाईक देशात सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल आहे. स्प्लेंडरच्या 100 सीसी वेरिएंट मॉडेलला स्प्लेंडर प्लस व 125 सीसी मॉडेलला सुपर स्प्लेंडर असे नाव आहे.  Hero ने आपल्या Splendor दुचकीला आधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असे  Xtec मॉडेल लॉन्च केले आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सुविधा देखील प्रदान करण्यात आली आहे. तुम्हाला स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी नवीन स्प्लेंडर खरेदी करायचे असल्यास ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. 

Hero Splendor प्लसच्या सर्व मॉडेल्स किंमत

  • स्प्लेंडर प्लस सेल्फ अलॉय व्हील व्हेरियंटची किंमत 72,076 रुपये आहे.
  • स्प्लेंडर प्लस प्लस सेल्फ अलॉय व्हील i3S व्हेरिएंटची किंमत 73,396 रुपये आहे.
  • स्प्लेंडर प्लस ब्लॅक आणि एक्सेंट व्हेरियंटची किंमत 73,396 रुपये आहे.
  • स्प्लेंडर प्लस मॅट शील्ड गोल्ड व्हेरिएंटची किंमत ७४,३९६ रुपये आहे.
  • स्प्लेंडर प्लस एक्सटेक व्हेरिएंटची किंमत 76,346 रुपये आहे.

या सर्व एक्स शोरूम किमती आहेत. Hero Splendor Plus चे मायलेज 70 kmpl ते 83.2 kmpl दरम्यान आहे.

Hero Super Splendor च्या सर्व मॉडेल्सची किंमत

  • सुपर स्प्लेंडर प्लस न्यू ड्रम व्हेरियंटची किंमत 79,118 रुपये आहे.सुपर स्प्लेंडर प्लस नवीन डिस्क व्हेरिएंटची किंमत 79,348 रुपये आहे.
  • सुपर स्प्लेंडर प्लस कॅनव्हास ब्लेड एडीशन व्हेरिएंटची किंमत 83,018 रुपये आहे.
  • सुपर स्प्लेंडर प्लस कॅनव्हास ब्लॅक एडीशन  डिस्क व्हेरिएंटची किंमत 83,248 रुपये आहे.
  • सुपर स्प्लेंडर प्लस एक्सटेक ड्रम प्रकारची किंमत 83,638 रुपये आहे.
  • सुपर स्प्लेंडर प्लस एक्सटेक डिस्क व्हेरिएंटची किंमत 87,268 रुपये आहे.

या सर्व एक्स शोरूम किमती आहेत. Hero Super Splendor'चा मायलेज 55 kmpl ते 68 kmpl दरम्यान आहे.