Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hero-Honda ही जोडी का फुटली? काय होतं कारण? जाणून घ्या

Hero & Honda Company Seperation

आजही मोटारसायकल (Motorcycle) म्हटलं की डोळ्यासमोर हिरो-होंडाची स्प्लेंडर (Splendor) मोटरसायकल उभी राहते. हिरो आणि होंडा यांनी 26 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण, दोघांनी हा निर्णय का घेतला? काय कारण होतं? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

⁠⁠⁠⁠⁠पूर्वी दुचाकी म्हटली की बऱ्यापैकी सगळीकडे हिरो-होंडाच दिसायची. कारण, सर्वच बाबतीत या दुचाकीने ग्राहकांचा विश्वास जिंकला होता. काही दिवसांतच हिरो-होंडाने ब्रॅण्ड म्हणून ऑटोमोबाईल मार्केटमध्ये स्वत:चे वर्चस्व निर्माण केले होते. भारतातील हिरो आणि जपानच्या होंडा कंपनीने एका करारानुसार हिरो-होंडा नावाने संयुक्त कंपनी 1984 मध्ये उभारली होती. त्यांची पार्टनशीप 2010 पर्यंत टिकली. त्यानंतर वेगळे होऊन त्यांनी स्वतंत्र बिझनेस सुरू करायचं ठरवलं.  यात होंडाने त्यांचा संपूर्ण हिस्सा हिरोला विकला आणि होंडा हिरोपासून वेगळी झाली. त्यावेळी उद्योजकांना आणि भागधारकांना हिरो कंपनीचे काय होईल याची शंका होती. पण पुढे काय झाले ते सर्वांनाच माहिती आहे. ते वेगळे का झाले हे आता आपण समजून घेऊयात.

मार्केटवर नियंत्रण मिळवण्याचे उद्दिष्ट

हिरो आणि होंडा यांची भारतातील भागीदारी प्रामुख्याने धोरणात्मक गोष्टींमुळे संपुष्टात आली होती. त्यामुळे हिरो आणि होंडा यांनी भारतीय बाजारपेठेसाठी वेगवेगळे दृष्टिकोन आणि धोरणे स्वीकारली. Hero MotoCorp (पूर्वीचे Hero Honda) चे उद्दिष्ट होते की, आपल्या व्यवसयाचा विस्तार करून स्वतःचा ब्रँड प्रस्थापित करायचा. तर दुसरीकडे, होंडाला तिच्या स्वतंत्र कामकाजावर लक्ष केंद्रित करायचे होते. तसेच, भारतीय मार्केटवर अधिक नियंत्रणासह आपले अस्तित्व अजून मजबूत करायचे होते.

ब्रँड म्हणून हवी होती ओळख!

पार्टनरशीप संपल्याने हिरोला होंडापेक्षा वेगळी स्वतःची ब्रँड ओळख निर्माण करणे सोपे झाले. Hero ने Hero MotoCorp या नावाने काम सुरू ठेवले आणि Honda ब्रँडचे नाव आणि लोगो सोडला. यासोबतच स्वतःचा ब्रँड तयार करून एक स्वतंत्र युनिट म्हणून प्रस्थापित होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले.

तंत्रज्ञान विकास होता महत्वाचा  

पार्टनरशीप संपल्यानंतर Hero MotoCorp ला स्वतःचे तंत्रज्ञान विकसित आणि नवनवीन गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. तर पूर्वी Honda कंपनी हिरोला तांत्रिक मदत पुरवत होती. तसेच, हिरोला स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करायचे होते. जे भागीदारी संपल्यानंतर शक्य झाले. त्यानंतर स्वतःचे इंजिन आणि मोटरसायकल मॉडेल्स विकसित करण्यासाठी हिरोने रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटमध्ये (R&D) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.

जागतिक विस्तार वाढवण्याचे ध्येय

हिरो मोटोकॉर्पचा (Hero MotoCorp) जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा निर्णय होंडाच्या मजबूत जागतिक अस्तित्व राखण्याच्या इच्छेच्या विरोधात होता. त्यामुळे वेगळं होवून, दोन्ही कंपन्या संयुक्त उपक्रमाच्या अडचणीतून मुक्त झाल्या. यामुळे दोघांनाही त्यांनी ठरवलेल्या जागतिक विस्तार धोरणांचा स्वतंत्रपणे पाठपुरावा करता आला आणि आता  हिरो मोटोकॉर्पने  (Hero MotoCorp)  जागतिक स्तरावर त्यांचा पाया भक्कम मजबूत केला आहे. विशेष म्हणजे, जोडी फुटल्यानंतरही, हिरो आणि होंडा या दोन्ही कंपन्या भारतीय मार्केटमध्ये चांगला बिझनेस करत आहेत. Hero MotoCorp आता भारतातील सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. तर, होंडा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आपलं अस्तित्व निर्माण करणं चुकीचं नाही. तेच या दोन्ही कंपन्यानी केलं आहे. आज त्यांनी जे ठरवलं होतं ते पू्र्ण केलं आहे. तसेच, मार्केटमध्ये  त्यांनी आपली ओळख नव्याने निर्माण केली आहे. आजही हिरो-होंडात लोकांचं कन्फ्यूजन होत असले तरी दोन्ही कंपन्यांनी त्यांचा चांगल्यापैकी जम बसवला आहे.