5 Top Cars: कार खरेदी करायचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 ते 20 लाख असेल तर या कार्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. कमी बजेट मध्ये उत्कृष्ट फीचर्स असणाऱ्या कोणत्याही वस्तूला अधिक मागणी असते. 10-20 लाख रुपयांच्या बजेटमधील 5 सर्वोत्तम कार्स पुढीलप्रमाणे..
Table of contents [Show]
मारुती सुझुकी जिमनी (Maruti Suzuki Jimny)
भारतातील लोक खूप दिवसांपासून मारुती जिमनीची वाट पाहत होते. आता अखेर कंपनीने हे वाहन भारतीय बाजारपेठेत सादर केले आहे. अवघ्या आठवडाभरात जिमीसाठी 9,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. मारुती सुझुकी जिमनीची किंमत 10 लाख (एक्स-शोरूम) आहे. Expected Launch Date मार्च 2023 आहे. कर्ज EMI पाच वर्षांसाठी 16,607 रुपये आहे. वाहनाच्या किमतीच्या 80 टक्के कर्जासाठी नऊ टक्के व्याजदराने पाच वर्षांसाठी आहे. इंधन प्रकार पेट्रोल आहे. इंजिन क्षमता 1.5 लिटर आहे. मायलेज 16 kmpl असू शकते.
किया Carens (Kia Carens)
किया Carens ची किंमत 10.2 लाख ते 18.45 लाख एक्स-शोरूम आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये लॉंच झाली आहे. कर्ज EMI पाच वर्षांसाठी 16939 ते 30639 असणार आहे. वाहनाच्या किमतीच्या 80 टक्के कर्जासाठी नऊ टक्के व्याजदराने पाच वर्षांसाठी आहे. इंधन प्रकार पेट्रोल, डिझेल आहे. इंजिन क्षमता: 1.5L (NA), 1.4L (Turbo), 1.5L (डिझेल) अशी आहे. मायलेज 15.7 kmpl (पेट्रोल MT) 16.2 kmpl (टर्बो पेट्रोल एमटी) 16.5 kmpl (टर्बो पेट्रोल DCT) 21.3 kmpl (डिझेल MT) 18.4 kmpl (डिझेल AT) असे आहे.
मारुती ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara)
मारुती ग्रँड विटाराची किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख एक्स-शोरूम आहे. ही सप्टेंबर 2022 मध्ये लॉंच झाली आहे. कर्ज EMI पाच वर्षांसाठी 17354 ते 32632 असू शकते. इंधन प्रकार पेट्रोल, पेट्रोल/हायब्रीड, पेट्रोल/सीएनजी असा आहे. इंजिन क्षमता 1.5 लिटर आहे. मायलेज 21.11 kmpl (नॉन-हायब्रिड), 27.97 kmpl (स्ट्राँग हायब्रिड) असे आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio n)
महिंद्रा स्कॉर्पिओ एनची किंमत 12.74 ते 24.05 लाख (एक्स-शोरूम) आहे. जुलै 2022 मध्ये लॉंच झाली आहे. कर्ज EMI पाच वर्षांसाठी 21,153 ते 39,939 रुपये आहे. इंधन प्रकार पेट्रोल, डिझेल आहे. इंजिन क्षमता 2L (टर्बो पेट्रोल), 2.2L (डिझेल) आहे. मायलेज 11.5 kmpl (पेट्रोल), 14 kmpl (डिझेल) अपेक्षित आहे.
होंडा सिटी हायब्रीड (Honda City Hybrid)
होंडा सिटी हायब्रीडची किंमत 19.89 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. मे 2022 मध्ये लॉंच झाली आहे. कर्ज EMI पाच वर्षांसाठी 33,027 असू शकते. इंधन प्रकार पेट्रोल हायब्रिड आहे. इंजिन क्षमता 1.5 लिटर आहे. मायलेज 26.5 kmpl अपेक्षित आहे.