Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: बँकेच्या मुदत ठेवीमधून सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर व्याजदराचे गणित समजून घ्या

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD

HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: तुम्हीही बँकेच्या मुदत ठेवीत (Fixed Deposit Scheme) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर देशातील नामांकित एचडीएफसी बँक (HDFC Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर देत आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणूक पद्धत म्हणून लोक आजही मुदत ठेवीकडे (Fixed Deposit Scheme) पाहतात. यामध्ये निश्चित कालावधीसाठी बँका ठराविक व्याजदर देतात. देशातील नामांकित एचडीएफसी  बँक (HDFC Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर (Intereset) देतात. जर तुम्हीही बँकेच्या मुदत ठेवीत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर वरील बँकांचा व्याजदर आणि परताव्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

बँकांचा मुदत ठेवीवरील व्याजदर जाणून घ्या

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक (HDFC Bank) 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवींवर (FD) सर्वसामान्य नागरिकांना 3% ते 7% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.50% व्याजदर देत आहे. सर्वसामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50% जास्त व्याजदर देण्यात येत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवींवर 3% ते 6.50% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.50% व्याजदर देण्यात येत आहे.

खासगी क्षेत्रातील आघाडीची अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना मुदत ठेवींवर 3.50% ते 7.50% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.75% व्याजदर देत आहे.

परताव्याचे गणित जाणून घ्या

जर तुम्ही एचडीएफसी बँकेमध्ये मुदत ठेव (HDFC Bank FD) करण्याचा विचार करत असाल, तर 10,000 रुपये 5 वर्षासाठी गुंतवल्यावर तुम्हाला 7 टक्केच्या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी 14,148 रुपये मिळतील. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदरानुसार 14,499 रुपये परतावा मिळेल.

10,000 रुपये रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 5 वर्षासाठी मुदत ठेवीत (SBI Bank FD) गुंतवली, तर 6.50 टक्के व्याजदराच्या हिशोबाने तुम्हाला 13,804 रुपये मिळतील. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदरानुसार 14,999 रुपये परतावा स्वरूपात मिळतील.

खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेमध्ये 10,000 रुपये 5 वर्षासाठी मुदत ठेवीत (Axis Bank FD) गुंतवले, तर सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या 7 टक्के व्याजदराच्या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 14,148 रुपयांचा परतावा मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या 7.75 टक्के व्याजदराच्या हिशोबाने 14,678 रुपये परतावा मिळेल.

Source: hindi.news18.com