Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Vs SBI Bank Home Loan: घर घेण्याचा विचार करत असाल, तर कुठे मिळेल गृहकर्जावर कमी व्याजदर, जाणून घ्या

HDFC Vs SBI Bank Home Loan

HDFC Vs SBI Bank Home Loan: घर खरेदी करणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक असते. जर तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल, तर एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) गृहकर्जावर किती व्याजदर आकारतात, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

आपले स्वतःचे घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी अनेकजण काबाडकष्ट करून पैसे जमा करतात. सध्या रियल इस्टेट क्षेत्रातील प्रॉपर्टीचे दर प्रचंड प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळेच एकरकमी पैसे देऊन मालमत्ता खरेदी करणे, प्रत्येकाला शक्य होत नाही. अनेकांचे गृहस्वप्न साकार करण्यात बँकांचा मोलाचा वाटा आहे. बँका उमेदवारांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर गृहकर्ज उपलब्ध करून देतात. या गृहकर्जावर व्याजदर आकारला जातो. मासिक ईएमआय स्वरूपात कर्जदार गृहकर्जाचे हप्ते फेडतो.

घर खरेदी करणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक असते. हे कर्ज दीर्घकालीन स्वरूपाचे असल्याने सर्वात कमी व्याजदर असेल, तर कर्ज लवकरात लवकर फेडणे शक्य होते. त्यामुळे गृहकर्जावर कमी व्याजदर आकारणाऱ्या बँकांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल, तर देशातील सर्वात मोठी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील (State Bank of India) गृहकर्जावरील व्याजदर जाणून घ्या. या दोन बँकांपैकी कोणत्या बँकेत सर्वात कमी व्याजदर आकारला जातो, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एचडीएफसी बँकेतील गृहकर्जाबद्दल जाणून घ्या

एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना गृहकर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही बँक जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज उपलब्ध करून देते. सध्या बँक गृहकर्जावर 8.4% वार्षिक व्याजदर आकारत आहे. हे गृहकर्ज जास्तीत जास्त 30 वर्षासाठी घेतले जाऊ शकते. गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 18 वर्ष, तर कमाल वय 65 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.अर्जदाराच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास करून एचडीएफसी बँक अर्जदाराला त्याच्या पात्रतेनुसार गृहकर्ज उपलब्ध करून देते.

गृहकर्जाच्या एकूण रकमेवर 0.50% किंवा 3000 रुपये यापैकी जी रक्कम सर्वाधिक असेल, त्या रकमे इतकी प्रोसेसिंग फी बँकेला द्यावी लागते. जर तुम्हालाही एचडीएफसी बँकेमधून गृहकर्ज घ्यायचे असेल, तर तुमचे ओळखपत्र, रहिवासी दाखला,6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, शैक्षणिक पात्रता दाखवणारे मार्कलिस्ट, फॉर्म 16 आणि सॅलरी स्लिप यासारखे कागदपत्र सादर करावे लागणार आहेत.

एसबीआयच्या गृहकर्जाबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध करून देते. किमान 5 लाख रुपये, तर कमाल 10 कोटी रुपयांपर्यंत हे गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाते. ज्यावर सध्या बँक 8.7% व्याजदर आकारत आहे. हे गृहकर्ज जास्तीत जास्त 30 वर्षासाठी घेतले जाऊ शकते. गृह कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 18 वर्ष, तर कमाल वय 70 वर्ष निश्चित करण्यात आले आहे. गृहकर्जावर स्टेट बँक ऑफ इंडिया 5000 रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फी चार्ज करते.

जर तुम्हालाही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गृह कर्ज घ्यायचे असेल, तर ओळखपत्र, रहिवासी दाखला, मालमत्तेचे कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला, सॅलरी स्लिप, फॉर्म 16 यासारखे कागदपत्र बँकेला सादर करणे गरजेचे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामधून गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर घरबसल्या ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

25 लाखांच्या गृहकर्जाचा मासिक हप्ता किती असेल?

जर तुम्ही एचडीएफसी बँकेमधून 25 लाखांचे गृहकर्ज 20 वर्षासाठी 8.4% हिशोबाने घेतले, तर तुम्हाला मासिक 21,538 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. मात्र हेच कर्ज तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेमधून घेतले, तर 8.7% व्याजदरानुसार तुम्हाला मासिक 22,013 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.

Source: hindi.moneycontrol.com