Home Loan Processing Fee: सुंदर घर असावं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. मात्र, ते सहजासहजी पूर्ण होत नाही. पण, ज्यांना घर घ्यायचे आहे, ते मार्ग काढतातच. यासाठी मग बॅंकांचे दार ठोठावणे आलेच. पण, त्याआधी बॅंकाच्या चार्जेसची माहिती काढून गेल्यास आणि त्यांची इतर बॅंकाबरोबर तुलना केल्यास तुमचा फायदा होऊ शकतो.
कारण, प्रत्येक बॅंकेत प्रोसेसिंग फी द्यावीच लागते. त्याशिवाय प्रत्येक लेंडर्स वेगवेगळे चार्जेस आकारतो आणि ते तुमच्या होम लोनच्या रकमेवर देखील ठरवले जाते. त्यामुळे याविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
Table of contents [Show]
या कामाच्या गोष्टी ठेवा लक्षात
होम लोन घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. ती म्हणजे होम लोनची प्रोसेसिंग फी मंजुरीनंतरच द्यावी लागते. कारण, हे सेवा चार्ज आहे, यालाच बऱ्याचदा प्रशासकीय शुल्क म्हणून ओळखल्या जाते. यामध्ये शेवटच्या किमतीत 18 टक्के जीएसटी देखील जोडला जातो. मात्र, काही परिस्थितीत तुम्हाला आगाऊ रक्कमही द्यावी लागू शकते.
तसेच, ती नॉन-रिफंडेबल असू शकते आणि ती घेणे पूर्णपणे लेंडर्सवर अवलंबून आहे. याशिवाय लेंडर्स क्रेडिट अंडरराईटिंगशी संबंधित सर्व चार्जेस प्रोसेसिंग फीद्वारे घेऊ शकतो. तर काही लेंडर्स फिक्स प्रोसेसिंग चार्जेस आकारतात आणि व्हेरिएबल प्रोसेसिंग फी आकारतात जे लोन रकमेच्या 2 टक्क्यांपर्यंत असू शकते. त्यामुळे होम लोन घेण्याआधी बॅंकांचे चार्जेस माहिती असणे आवश्यक आहे.
पंजाब नॅशनल बॅंक (PNB) :
तुम्ही नोकरदार असल्यास PNB बॅंकेत तुम्हाला 8.50 टक्के ते 10.10 टक्के व्याज होम लोनवर भरावे लागणार आहे. बॅंक 0.35 टक्के (कमीत कमी 2,500 रुपये आणि जास्तीत जास्त 15,000 रुपये) प्रोसेसिंग फी आणि 1,350 रुपये डॉक्युमेंटेशन चार्ज आकारते.
एचडीएफसी बॅंक (HDFC Bank)
HDFC बॅंक देखील नोकरदारांना 8.50 टक्क्यांपासून 9.40 टक्क्यांपर्यंत होम लोनवर व्याज आकारत आहे. यात तुम्हाला प्रोसेसिंग खर्च लोन रकमेच्या 0.50 टक्के किंवा 3,000 रुपये, यापैकी जे जास्त असेल ते टॅक्ससह लागू होणार आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) टर्म लोन:
SBI बॅंक नोकरदारांना 8.70 टक्के ते 9.65 टक्क्यांपर्यंत होम लोन व्याजदर ऑफर करत आहे. बॅंक तुम्हाला लोन रकमेच्या 0.40 टक्के + जीएसटी (कमीत कमी 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त 30,000 रुपये + जीएसटी) प्रोसेसिंग फी आकारु शकते.
अॅक्सिस बॅंक (Axis Bank) :
Axis बॅंक नोकदारांना होम लोनवर 9.90 टक्के ते 10.50 टक्क्यांदरम्यान व्याजदर आकारत आहे. याशिवाय बँकेची प्रोसेसिंग फी लोन रकमेच्या 1 टक्क्यांपर्यंत असून कमीतकमी 10,000 रुपयांपर्यंत आहे.
आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank) :
ICICI बॅंक नोकरदारांना 9.25 टक्के ते 9.90 टक्क्यांपर्यंत होम लोनवर व्याजदर आकारत आहे. तर बॅंक प्रोसेसिंग चार्ज 0.50 टक्के ते 2 टक्क्यांदरम्यान घेत आहे. तर कमीतकमी 1,500 रुपये द्यावे लागू शकतात.
वरील बॅंकापैकी ज्या ठिकाणी तुमचे खाते आहे. तसेच, लोनचे दर आणि प्रोसेसिंग चार्जेस कमी आहेत. त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करु शकता. याशिवाय, हे टाॅपच्या बॅंकाचे चार्जेस 7 सप्टेंबर 2023 पर्यंतचे आहेत.