एचडीएफसी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींशिवाय आकर्षक गुंतवणूक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमधून ज्येष्ठ नागरिकांना 8% पर्यंत व्याजदर मिळू शकतो. कमी जोखीम घेऊन सुरक्षित गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय आहे. या योजनेला 'डायमंड डिपॉझिट' असे नाव दिले आहे. 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणुकीवर व्याजदर मिळेल. 1 मार्चपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
याशिवाय एचडीएफसी बँकेकडून Sapphire deposits, स्पेशल डिपॉझिट, प्रिमियम डिपॉझिट आणि रेग्युलर डिपॉझिट या स्कीमही सुरू करण्यात आल्या आहेत. किती काळ गुंतवणूक करण्यात येते, यावर व्याजदर अवलंबून आहे. गुंतवणुकीवरील परतावा मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक आणि शेवटी संचयीत, असे पर्याय उपलब्ध आहेत. प्लॅननुसार किमान गुंतवणुकीची रक्कमही बदलते.
डायमंड डिपॉझिट योजना - (Dimond Deposit Scheme HDFC)
डायमंड डिपॉझिट ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेकडून आणण्यात आली आहे. गुंतवणुकीची कालमर्यादा, रक्कम यानुसार व्याजदर मिळतो.
सफायर डिपॉझिट (Sapphire Deposit scheme HDFC)
सफायर डिपॉझिट ही गुंतवणूक योजना वैयक्तिक गुंतवणूक योजना आहे. या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यास 7.45% ते 7.70% पर्यंत व्याजदर मिळू शकतो. या योजनेमध्ये गुतंवणुकीचा कालावधी 45 महिने आहे.
स्पेशल डिपॉझिट योजना (Special Deposit Scheme HDFC)
एचडीएफसी स्पेशल डिपॉझिट योजनेत 33 महिने आणि 66 महिन्यांसाठी गुंतवणूक करता येईल. तुम्ही कोणता प्लॅन निवडता त्यावर व्याजदर अवलंबून आहे. मासिक परतावा हवा असेल तर कमीतकमी 40 हजार रुपये गुंतवावे लागतील. तर त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक परतावा हवा असेल तर किमान 20 हजार रुपये योजनेत गुंतवावे लागतील.
प्रिमियम डिपॉझिट योजना (Premium Deposit Scheme HDFC)
प्रिमियम डिपॉझिट योजनेत गुंतवणुकीसाठी तीन कालावधींचे पर्याय आहेत. 15 महिने, 22 महिने आणि 44 महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकतो. प्लॅननुसार व्याजदर ठरवला जाईल. मासिक परतावा हवा असेल तर कमीतकमी 40 हजार रुपये गुंतवावे लागतील. तर त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक परतावा हवा असेल तर किमान 20 हजार रुपये योजनेत गुंतवावे लागतील.
रेग्युलर डिपॉझिट (Regular Deposit)
रेग्युलर डिपॉझिट योजनेत 1 वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीपर्यंतच्या गुंतवणुकीचे पर्याय आहेत. मासिक परतावा हवा असेल तर कमीतकमी 40 हजार रुपये गुंतवावे लागतील. तर त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक परतावा हवा असेल तर किमान 20 हजार रुपये योजनेत गुंतवावे लागतील.
सिनियर सिटिझन (Senior citizen)
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, 60 वर्षांवरील व्यक्ती 2 कोटींपर्यंतच्या (आवर्ती ठेवी सोडून) गुंतवणुकीवर अतिरिक्त 0.25% व्याजदर मिळण्यास पात्र ठरतील. तसेच अतिरिक्त 0.05% रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट (ROI) ऑनलाइन मोडद्वारे केलेल्या वैयक्तिक गुंतवणुकीवर मिळेल.