• 28 Nov, 2022 16:22

Education loan परत करण्यास अडचण येत आहे का? तुम्ही वापरा हे सोपे मार्ग

education loan, loans, student, student loan

Education loan: एज्युकेशन लोन व्यतिरिक्त, इतर अनेक मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही उच्च शिक्षणासाठी निधीची आवश्यकता पूर्ण करू शकता. या पद्धतीचा अवलंब केल्याने तुम्हाला लोन घ्यायची गरजच पडणार नाही किंवा मग कमी लोन घ्याव लागेल. (Difficulty in repaying education loans)

Education loan: आजच्या काळात पालकांची संपूर्ण जमा पुंजी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होते. मुलांचे (Higher Education)उच्च शिक्षण देशात असो की विदेशात त्याला खर्च तर लागणारच. त्याचा अंदाज लावून जरी पैसे जुळवून ठेवले कधी कधी खर्च अपेक्षे बाहेर जातो. त्यामुळे एज्युकेशन लोन हा पर्याय वापरावा लागतो. तर यावर उपाय म्हणून इतर काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही उच्च शिक्षणासाठी निधीची आवश्यकता पूर्ण करू शकता. या पद्धतींच्या मदतीने एकतर तुम्हाला कर्ज घेण्याची गरजच भासणार नाही किंवा तुम्हाला कमी कर्ज घ्यावे लागेल.

(Kuhoo Fintech) कुहू फिनटेकचे संस्थापक प्रशांत भोंसले म्हणाले की, आजकाल उच्च शिक्षण महाग झाले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी अनेकदा कर्जावर अवलंबून राहावे लागते. म्हणूनच, त्यांनी त्यांच्या खर्चाचे नियोजन आणि व्यवस्थापन कसे करावे हे शिकणे अत्यावश्यक आहे जेणेकरून ते ही कर्जे फेडू शकतील आणि खऱ्या अर्थाने स्वावलंबी होऊ शकतील. भोसले यांनी काही निवडक मार्ग सांगितले आहे. ज्यांच्या मदतीने विद्यार्थी एज्युकेशन लोनवर अवलंबून राहणार नाही. 

ते तीन मार्ग पुढीलप्रमाणे, 
1. बचत/गुंतवणूक (Savings/Investments)
2. स्कॉलरशिप (Scholarships)
3. लोन (Loans)

कोणत्याही निर्णय घेण्याआधी खर्चाचा अंदाज घ्या,

तुमच्या शिक्षणात झालेल्या खर्चाचा अचूक अंदाज घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. खर्चामध्ये ट्यूशन फी आणि इतर राहणीमान खर्चाचा समावेश असू शकतो. उपलब्ध निधीव्यतिरिक्त, तुम्ही कर्ज घेऊन आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीची पूर्तता करू शकता. यासोबतच अभ्यासानंतर त्या क्षेत्रात तुमचा पगार किती असू शकतो याचाही अंदाज घ्या. यामुळे तुम्हाला किती EMI परवडेल हे समजण्यास मदत होईल. आतापासूनच कर्जाची परतफेड करण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत. तुमच्या स्वतःच्या क्षेत्रात पैसे कमवण्यासाठी तुम्ही इंटर्नशिप प्रोजेक्ट, वर्क/पार्ट टाइम, टीचिंग जॉब, रिसर्च असिस्टंट पर्यायांचा विचार करू शकता. जगभरातील अनेक मास्टर्स/पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल यासाठी प्रयत्न केले जातात.

शैक्षणिक कर्ज घेण्याचे काही फायदे 

शिक्षणाच्या खर्चासाठी तुम्ही आगाऊ तयारी केल्यास तुम्ही अनेक मोठ्या समस्या टाळू शकता. जरी सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की एखाद्याने कर्ज घेऊ नये, परंतु कधीकधी कर्ज घेणे देखील फायदेशीर ठरते. 

शैक्षणिक कर्ज घेण्याचे तीन फायदे आहेत

1. जबाबदारीची जाणीव 
2. पालकांच्या रिटायर फंडची बचत
3. तुमच्या शिक्षणादरनंतर  तुम्ही पॉझिटिव क्रेडिट हिस्ट्री तयार करू शकता. तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता आणि यामुळे तुम्हाला भविष्यात लोन मिळणे सोपे होऊ शकते.