Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Handbags under 300 Rupees : या सर्वोत्कृष्ट हँडबॅग 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत आहेत उपलब्ध

Handbags under 300 Rupees

Image Source : www.indiamart.com

हँडबॅग्स म्हणजे महिलावर्गाची फॅशनमधील आवडती वस्तू. ती खरेदी करताना बॅगच्या मटेरियलपासून ते पैशांपर्यंत सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती महिला मिळवतात. आजकाल ऑनलाइन शॉपिंगला (Online Shopping) जवळपास सर्वजण पसंती दर्शवतात. तेव्हा अशाच काही परवडणाऱ्या किंमतीतील हॅंडबॅग्स आज आपण पाहूया.

आपल्या स्टाईल आणि बजेटनुसार महिलावर्ग हँडबॅग्सची खरेदी करत असतात. दीर्घकाळ टिकणारे आणि टिकाऊ हँडबॅग्स कोणाला नाही आवडणार? तुमच्या आधुनिक तसेच पारंपरिक प्रत्येक लुकमध्ये हँडबॅग मॅच करावी असे प्रत्येकीला वाटते. पण त्यासोबतच हँडबॅग खरेदी करताना त्या परवडणाऱ्या किंमतीत मिळाव्या अशी प्रत्येकीची इच्छा असते. अशाच काही उच्च दर्जाच्या लेदरने बनवलेल्या, सहज न फाटणाऱ्या, स्क्रॅच विरोधी तसेच अॅडजस्टेबल आणि डिटेचेबल स्ट्रॅप्सने युक्त आणि बजेट फ्रेंडली हँडबॅग्स आज आपण पाहूया. या हँडबॅग्स ऑनलाइन (Online Shopping) उपलब्ध आहेत. या बॅग खरेदी करण्यासाठी ब्ल्यू कलरमधील बॅगच्या नावावर क्लिक करा. तुमच्यासमोर अँमेझॉनची साईट ओपन होईल. तेथून तुम्ही ही बॅग खरेदी करु शकता.

शॉपर बॅग (नेव्ही ब्लू)

शॉपर बॅग (नेव्ही ब्लू), ही सॅचेल (Satchel) बॅग व्हेगन लेदरपासून बनवली आहे. ती इको फ्रेंडली आहे. ही बॅग हायली अँन्टी स्क्रॅच आणि टियर रेझिस्टंट आहे. ही बॅग आऊट ऑफ शेप होत नाही. या बॅगचे रोल्ड लेदर टॉप हँडल बॅग कॅरी करायला कंम्फर्टेबल बनवते. त्याचे हँडल टिकाऊ धातूचे बनलेले आहे. तुम्हाला ही बॅग ग्रे, नेव्ही ब्लू आणि ब्राऊन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला अनेक पॉकेट्स मिळत आहेत. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनावश्यक वस्तू ठेवू शकता. हे सर्वोच्च पीयू फॅब्रिक गुणवत्तेपासून बनवले आहे. त्यामुळे ही बॅग टिकाऊ, दीर्घकाळ टिकणारी ठरते.

जेएसएम फॅशन हँडबॅग

जेएसएम फॅशन हँडबॅग, ही बॅग फॉक्स लेदरची बनलेली आहे. या बॅगला शोल्डर स्ट्रॅप आहे. ही एक अतिशय सुंदर आणि स्टाइलिश बॅग आहे. ही बॅग तुम्ही कॅज्युअल, आऊटिंग, ऑफिस, पार्टी, ट्रिप, दैनंदिन वापरातही वापरू शकता. तुम्ही ही बॅग सर्वत्र घेऊन जाऊ शकता आणि कोणत्याही पोशाखासह ही बॅग स्टाईल करू शकता. या बॅगचे मटेरिअल दीर्घकाळ टिकणारे आणि टिकाऊ आहे. ते लवकर फाटत नाही आणि त्याचा धागाही बाहेर पडत नाही. त्यावर कोणताही ओरखडा येत नाही. या बॅगेत तुम्हाला खूप चांगली स्टोरेज स्पेस मिळते. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व आवश्यक वस्तू ठेवू शकता.

फार्गो लेथरेट मल्टी कंपार्टमेंट लॅपटॉप हँडबॅग्ज

जर तुम्हाला काळा रंग खूप आवडत असेल तर महिलांनो फार्गो लेथरेट मल्टी कंपार्टमेंट लॅपटॉप हँडबॅग्ज ही हँडबॅग तुमच्यासाठी योग्य आहे. लेदर मटेरिअलने बनवलेली ही काळी बॅग अतिशय क्लासी आणि ट्रेंडी आहे. सुरक्षिततेसाठी यात टॉप झिप क्लोजर आहे. त्याच्या आतील भागात तीन कप्पे आहेत. याचा अर्थ तुम्हाला त्यात भरपूर जागा मिळत आहे. तुम्ही ही बॅग सहज कॅरी करू शकता. ही बॅग उच्च दर्जाचे फॉक्स लेदरपासून बनवली आहे. यामध्ये तुम्हाला अॅडजस्टेबल स्ट्रॅप मिळत आहे. मॉडर्न ते ट्रॅडिशनल लूकमध्ये तुम्ही स्टाईल करू शकता.

मॅमन महिला टोटे बॅग

तुम्हाला मॅमन महिला टोटे बॅग ही बॅग अतिशय वाजवी दरात मिळत आहे. या बॅगची स्टाईल आणि लुक एकदम अनोखा आहे. ही बॅग तुमच्या प्रत्येक आउटफिटला शोभेल. कॅज्युअल, ऑफिस, पार्टी, लग्न, आऊटिंग आणि नाईट आउटमध्येही नेता येईल. तुम्ही ही बॅग टॉप्स, टी-शर्ट आणि शर्टमध्येही कॅरी करू शकता आणि तुमच्या कुर्ता, सूट आणि साड्यांमध्येही कॅरी करू शकता. या बॅगचे मटेरिअल इतक्या लवकर फाटत नाही. तुम्ही ही बॅग डेली यूज साठीही वापरू शकता.

टीप टॉप फॅशन सोपार हँड बॅग ग्रे

तुम्ही तुमच्या सर्व आवश्यक वस्तू टीप टॉप फॅशन सोपार हँड बॅग ग्रे या बॅगेच्या अनेक कंपार्टमेंटमध्ये ठेवू शकता. ही बॅग पीयू लेदर मटेरियलपासून बनवण्यात आली आहे. त्यामुळे ते दीर्घकाळ टिकणारी आणि टिकाऊ आहे. ही बॅग तुम्हाला दीर्घकाळ टिकेल याची खात्री देते. अल्ट्रा सॉफ्ट क्वालिटी हे या बॅगेचे वैशिष्ट्य आहे. ही बॅग सहज कॅरी करता येते. कारण यामध्ये तुम्हाला डिटेचेबल आणि अॅडजस्टेबल स्ट्रॅप मिळत आहे. तुम्ही ते टोट बॅग, क्रॉस बॉडी बॅग आणि हँड पर्समध्ये देखील वापर करु शकता. या बॅगचा प्रत्येक लुक तुमच्या प्रत्येक पोशाखाला कंप्लिट करतं.