Scholarship Scheme: गुजरात सरकार शिक्षण क्षेत्रात गुणात्मक सुधारणा करण्यासाठी अनेक सहाय्य योजना राबवित असते. ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करण्यासाठी RTE प्रवेशासारख्या योजनांद्वारे प्रवेश दिला जातो. अशीच एक नवीन शिष्यवृत्ती योजना सरकारने जाहीर केली आहे, ज्याचे नाव ज्ञान साधना शिष्यवृत्ती योजना असे आहे. या योजनेत इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिल्या जाते. या शिष्यवृत्ती योजनेत परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. ज्यासाठी पात्रताधारक विद्यार्थी फॉर्म भरू शकतात.
Table of contents [Show]
योजनेचा लाभ घेण्यास पात्रता
सरकारी किंवा अनुदानित प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ते 8 वी पर्यंत सतत शिक्षण घेतलेला आणि इयत्ता 8 वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो.
तसेच, RTE प्रवेश योजनेंतर्गत खाजगी शाळेत इयत्ता 1 मध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी असावा आणि इयत्ता 8 वी पर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
परीक्षा शुल्क किती?
ज्ञान साधना शिष्यवृत्ती योजनेसाठी ज्ञान साधना अभियोग्यता चाचणी घेतल्या जाते. परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरावे लागत नाही.
विद्यार्थ्यांची निवड कशी होते?
ज्ञान साधना शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांची निवड परीक्षेतील कट ऑफ मेरिटच्या आधारे केली जाते. ज्ञान साधना अभियोग्यता चाचणी या परीक्षेची प्रश्नपत्रिका एकूण 120 गुणांची असेल आणि वेळ 150 मिनिटांचा असतो.
परीक्षेची प्रश्नपत्रिका गुजराती आणि इंग्रजी भाषेत असते, विद्यार्थी ही परीक्षा गुजराती किंवा इंग्रजीत त्यांच्या आवडीच्या माध्यमातून देऊ शकतात.
शिष्यवृत्तीची रक्कम किती?
ज्ञान साधना शिष्यवृत्ती योजनेत कट ऑफ मेरिटच्या आधारे निवडलेल्या विद्यार्थ्यांना 9वी आणि 10वी करीता वार्षिक 20000 रुपये शिष्यवृत्ती दिल्या जाते. तसेच, 11वी आणि 12वी करीता वार्षिक 25000 रुपये शिष्यवृत्ती दिल्या जाते. 9वी ते 12वी पर्यंत शिकत असताना विद्यार्थी कोणत्याही वर्गात नापास झाला किंवा शाळा सोडली तर विद्यार्थ्याला मिळणारी शिष्यवृत्ती बंद होईल.
- या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याला ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो.
- त्यानंतर चाचणीद्वारे कट ऑफ मेरिटच्या आधारे तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली जाते.
- त्यानंतर विद्यार्थ्याची कागदपत्रे पडताळणी जिल्हास्तरावर केली जाते.
- त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते.
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरीचा फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र