Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Great Indian Festival Sale: 'या' तारखेला सुरू होतोय Amazon चा सेल, 'या' प्रोडक्ट्सवर मिळेल मोठा डिस्काउंट

Great Indian Festival Sale

Image Source : www.logowik.com

सध्या सणासुदीमुळे बऱ्यापैकी ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मवर ऑफर्सची बरसात सुरू आहे. Amazon ने सुद्धा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख जाहीर केली आहे. अ‍ॅमेझाॅन या सेलमध्ये फोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्के, स्मार्टवॉच आणि हेडफोनवर 75 टक्के आणि लॅपटॉपवर 40,000 रुपयांपर्यंत मोठा डिस्काउंट देण्याच्या तयारीत आहे. तसेच, टॅब्लेटवर देखील 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच फ्लिपकार्टने देखील त्यांच्या सेलची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच आता अ‍ॅमेझॉनने देखील त्यांच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची अधिकृत घोषणा केली असून, याचा लाभ युझर्सना 10 ऑक्टोबरपासून घेता येणार आहे. त्यामुळे या सेलची वाट पाहणाऱ्या युझर्सची प्रतीक्षा आता संपली आहे. 

बजेटमध्ये करा खरेदी

येत्या दिवाळी सणाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या सेलमध्ये स्मार्टफोन, अ‍ॅक्सेसरीज, लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन, टॅब्लेट यासह अनेक प्रोडक्टवर लक्षणीय सूट देण्यात येणार आहे. याविषयी माहिती अजूनपर्यंत जाहीर केली नसली तरी टीझर पेजने सेलदरम्यान डिस्काउंटच्या दरात उपलब्ध होणाऱ्या काही स्मार्टफोन्सची पुष्टी केली आहे. त्यामुळे युझर्सना बजेटमध्ये चांगल्या प्रोडक्टचा लाभ घेता येणार आहे.

या प्रोडक्टवर मिळेल मोठा डिस्काउंट

ज्यांना नवीन फोन घ्यायचा आहे ते या सेलद्वारे फोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकणार आहेत. तसेच, जे स्मार्टवॉच, हेडफोन आणि यांच्याशी संबंधित अ‍ॅक्सेसरीज घेऊ इच्छित आहेत त्यांना देखील या प्रोडक्टवर 75 टक्के डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे.

याशिवाय लॅपटाॅपच्या शोधात असणाऱ्या युझर्सना अनेक डिव्हाईसवर 40,000 रुपयांपर्यंत मोठा डिस्काउंट मिळवता येणार आहे. तसेच, टॅब्लेट प्रेमींना देखील टॅब्लेटवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे ज्या युझर्सना फोन किंवा लॅपटाॅपची खरेदी करायची त्यांना कमी बजेटमध्ये प्रोडक्टचा लाभ घेता येणार आहे.

फोनच्या किमती होतील कमी 

अ‍ॅमेझॉनवरील सेल पेजवर वनप्लस 11आर (OnePlus 11R), सॅमसंग गॅलेक्सी एस 23 (Samsung Galaxy S23), आयक्यूओओ निओ 7 प्रो (iQOO Neo 7 Pro), वनप्लस 11 (OnePlus 11), वनप्लस नॉर्ड 3 (OnePlus Nord 3), मोटोरोला रेजर 40 अल्ट्रा (Motorola Razr 40 Ultra) आणि अन्य स्मार्टफोनवर अनबिटेबल ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. 

यावरून ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान फोनवर किमतीत स्पर्धा पाहायला मिळू शकते. याशिवाय,सॅमसंग गॅलेक्सी एम 14 (Samsung Galaxy M14), आयक्यूओओ झेड 6 लाइट (iQOO Z6 Lite) रेडमी 12, (Redmi 12), वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट (OnePlus Nord CE 3 Lite), आयक्यूओओ Z7s (iQOO Z7s) आणि अन्य लोकप्रिय फोनच्या किमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. तरी किमतींचे नेमके डिटेल्स अजून जाहीर करण्यात आले नाही.