Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Grant road to eastern freeway: मुंबईसाठी ग्रँट रोड ते इस्टर्न फ्रीवे रस्ता का महत्त्वाचा आहे? त्यासाठी किती खर्च होईल?

Grant road to eastern freeway

Image Source : www.constructionworld.in

Grant road to eastern freeway: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने, मुंबई महानगरपालिका (BMC) 5.6 किमी लांबीचा एलिवेटेड उन्नत मार्ग तयार करण्याचा विचार करत आहे, जो इस्टर्न फ्रीवेला ग्रँट रोडशी थेट जोडणार आहे. हा रोड कुठून कसा जाईल, तो कसा फायद्याचा ठरेल आणि त्यासाठी किती खर्च केला जाऊ शकतो हे जाणून घेऊयात.

कोणत्याही शहराचा विकास हा तेथील सामाजिक पायाभूत सुविधांवर (Social Infrastructure) अवलंबून असतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी (Finance Capital) आहे. या शहरात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच तर मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा भार लक्षात घेऊन, नवी मुंबई सुनियोजीतपणे विकसित करण्यात येत आहे. या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी आणि लोकांना सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी सरकारने अनेक रस्त्यांचे प्रकल्प सुरु केले आहेत.

यातील काही प्रकल्प हे अंतिम टप्प्यात आहेत, तर काही प्रकल्प लवकरच सुरु होणार आहेत. ज्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने, मुंबई महानगरपालिका (BMC) 5.6 किमी लांबीचा एलिवेटेड उन्नत मार्ग तयार करण्याचा विचार करत आहे, जो इस्टर्न फ्रीवेला ग्रँट रोडशी थेट जोडणार आहे. हा रोड मुंबईसाठी कसा महत्त्वाचा ठरेल आणि त्यासाठी साधारण किती खर्च केला जाऊ शकतो हे जाणून घ्या.

तीन वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी

ग्रँट रोड ते इर्स्टन फ्रीवे हे अंतर कमी करण्याकरिता मुंबई पालिका वेगवेगळ्या योजना आखत आहे. सध्या ग्रँट रोड ते इर्स्टन फ्रीवेला जाण्यासाठी 30 ते 50 मिनिटे लागतात. आता हेच अंतर 5 ते 7 मिनिटांवर आणण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने एलिवेटेड उन्नत मार्ग बांधण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे.

ग्रँट रोड ते इस्टर्न फ्रीवेपर्यंतचे अंतर 5.56 किमी आहे. एलिव्हेटेड रोडच्या बांधकामामुळे हे अंतर कमी वेळात पार करता येईल. ग्रँट रोड, नाना चौक, नॅपन्सी रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल परिसरही थेट एमएमआरशी (MMRDA) जोडला जाईल. याशिवाय शिवडी - वरळी लिंक रोड आणि ऑरेंज गेट ते कोस्टल रोड अशा दक्षिण भागात तीन वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी मिळणार आहेत.

हा मार्ग कुठून कसा जाईल?

हा नवा एलिवेटेड मार्ग फ्रीवेच्या ऑरेंज गेटपासून सुरु होईल. पुढे तो जे.राठोड रोड ते हँकॉक ब्रिजपासून जे.जे.उड्डाण पुलाच्या वरून मौलाना शौकत अली रोड ते फेरेरे ब्रिजच्या पूर्वेपर्यंत जाणार आहे.

हा रस्ता 2 ते 3 पदरी असावा असे वाहतूक अभ्यासातून समोर आले आहे. या मार्गावरून दररोज साधारण 23,000 हून अधिक वाहने वाहतूक करतील असा अंदाज बांधला जात आहे.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कशी मदत होईल?

शिवडी ते न्हावासेवा असणारा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड (MTHL) नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे साहजिकच फ्रीवेचे ट्रॅफीक वाढणार आहे. त्यामुळे 5.6 किमीचा एलिवेटेड रोड हे ट्रॅफीक दूर करण्यासाठी मदत करेल. या रोडमुळे 30 ते 50 मिनिटांचे अंतर अवघ्या 5 ते 7 मिनिटात पार करता येणार आहे.  

साधारण किती खर्च येईल?

हा रस्ता एकूण 5.6 किलोमीटर लांबीचा असणारा आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 743.28 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय महानगरपालिका (BMC) हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हा मार्ग केव्हा फायद्याचा ठरेल?

एमएमआरडीएने मरीन ड्राईव्ह ते फ्रिवे बोगदा कनेक्ट करण्याची योजना आखली आहे. हा भुयारी टनेल (Underground Tunnel) बांधल्यानंतर नवीन उन्नत मार्ग दक्षिण मुंबईतील इतर रहिवाशांच्या फायद्याचा ठरणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू (P. Velarasu) यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक बाबी क्लिअर झाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.

फ्रीवे ओरेंज गेट मानखुर्दशी जोडले असून तेथे देवनार आणि भक्तीमार्ग असे दोन फाटे आहेत. 2014 मध्ये हा मार्ग बांधला आहे. या मार्गामुळे दक्षिण मुंबईचे पूर्व उपनगराशी, तसेच नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि इतर मार्गांना जोडण्यासाठी मदत झाली आहे.