Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MTHL Update: 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' असलेल्या सागरी सेतूचं 90 टक्के काम पूर्ण; नोव्हेंबरपासून प्रवासासाठी खुला

MTHL

Image Source : www.business.moglix.com

MTHL Update: महाराष्ट्रातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' रोड(MTHL) या प्रकल्पाला ओळखले जाते.

MTHL Update: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा सागरी सेतू म्हणजेच 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड(MTHL)' हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मुंबईमधून नवी मुंबईला अगदी 20 मिनिटात पोहचणे शक्य होणार आहे. नुकतीच या प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. या ट्रान्स हार्बर लिंक रोडचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 10 टक्के काम लवकरच पूर्ण होऊन नोव्हेंबर पासून हा सागरी मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात येणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी(Chief Minister Eknath Shinde) सांगितले आहे. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी मार्ग

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड(MTHL) हा देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी मार्ग असून टोलिंग यंत्रणा असलेला पहिला मार्ग आहे. या प्रकल्पाचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले आहे. हा संपूर्ण प्रकल्प समुद्रात उभारण्यात येणार असून एकूण 70 ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेक(Orthotropic Steel Deck) स्पॅन पैकी एकूण 36 स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक(MTHL) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक(MTHL) प्रकल्पाच्या पॅकेज 2 मधील पहिला सर्वात जास्त लांबीचा म्हणजेच सुमारे 180 मीटर लांबीचा आणि सुमारे 2300 मेट्रिक टन वजनाचा ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात आली आहे. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री दादाजी भुसे, खासदार राहुल शेवाळे, संजय राठोड, एमएमआरडीएचे(MMRDA) महानगर आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज यांनी उपस्थिती दर्शवली होती.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (MTHL) वैशिष्टय काय?

  • मुंबई ट्रान्स हार्बर लिंक(MTHL) हा मुंबई शहरातील शिवडी व नवी मुंबईतील न्हावाशिवा यांना जोडणारा सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी (3+3 मार्गिका) सागरी पूल आहे
  • याची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी आहे
  • मुंबई ते नवी मुंबई हे अंतर या सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते 20 मिनिटांत पार करणे शक्य होईल
  • पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून जागतिक दर्जाचे बांधकाम तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे
  • या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसेल 
  • ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग म्हणून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला(MTHL) ओळखले जाईल