Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hindustan Zinc's-Vedanta Deal: हिंदुस्थान झिंक-वेदांतामधील 'त्या' व्यवहारावर केंद्राचा आक्षेप! काय आहे प्रकरण समजून घ्या

Hindustan Zinc Vedanta News

Image Source : www.business-standard.com

Hindustan Zinc's-Vedanta Deal: खनिज क्षेत्रातील हिंदुस्थान झिंकने वेदांता लिमिटेडकडील झिंक व्यवसाय खरेदी करण्याचा प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या व्यवहाराला विरोध केला आहे. हिंदुस्थान झिंककडून वेदांता लिमिटेडचा झिंक व्यवसाय 2.98 बिलियन डॉलर्सला विक्री करण्याचे ठराव मंजूर केला आहे.

खनिज क्षेत्रातील मोठी कंपनी हिंदुस्थान झिंकने वेदांता लिमिटेडचा झिंक व्यवसाय खरेदी  करण्याच्या प्रस्तावात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या व्यवहाराला विरोध केला आहे. केंद्र सरकारने कंपनीला विरोध करणारे पत्र सादर केले आहे. यामुळे वेदांता झटका बसला असून हा व्यवहार लांबणीवर पडला आहे.

हिंदुस्थान झिंककडून वेदांता लिमिटेडचा झिंक व्यवसाय 2.98 बिलियन डॉलर्सला खरेदी करण्याचे ठरवले आहे. 19 जानेवारी 2023 रोजी यासंदर्भात संचालक मंडळाने ठराव मंजूर केला होता. मात्र दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने देखील निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून हिंदुस्थान झिंकमधील 5 ते 10% हिस्सा विक्री करण्याचा विचार केला आहे. तत्पूर्वी वेदांताचा झिंक व्यवसाय खरेदी करण्यास हिंदुस्थान झिंक कंपनीला सरकारने विरोध केला आहे.

हिंदुस्थान झिंकमध्ये वेदांता लिमिटेड ही सर्वात मोठी हिस्सेदार कंपनी आहे. वेदांता लिमिटेडने हिंदुस्थान झिंकमध्ये 64.9% हिस्सा खरेदी करुन मालकी मिळवली आहे. त्याखालोखाल केंद्र सरकारची 29.5% हिस्सेदारी आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या हिंदुस्थान झिंकच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वेदांता समूहाची उपकंपनी असलेल्या टीएचएल झिंक व्हेंचर्स लिमिटेड (मॉरिशस)चा झिंक व्यवसाय आणि मालमत्ता खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याला हिंदुस्थान झिंकच्या संचालकांनी मंजुरी दिली होती.

हिंदुस्थान झिंकच्या संचालक मंडळावर असलेल्या केंद्र सरकार नियुक्त संचालकाने या व्यवहारावर आक्षेप घेतला आहे. तसेच केंद्रीय खाण मंत्रालयाने या व्यवहाराला विरोध करणारे पत्र पाठवले असल्याचे हिंदुस्थान झिंकने शेअर बाजाराला कळवले आहे. कंपनी कायद्याप्रमाणे या व्यवहाराला सर्वसाधारण सभेत आणि किरकोळ समभागधारकांची मान्यता घेऊनच पूर्ण केला जाईल, असे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे. मात्र समभागधारकांनी मिटींग केव्हा होईल याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्र सरकारचे आक्षेपाचे पत्र संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

…म्हणून सरकारचा या व्यवहाराला आहे विरोध

हिंदुस्थान झिंकला या प्रस्तावावर येत्या 18 महिन्यात मंजुरी घ्यावी लागणार आहे. हिंदुस्थान झिंकने वेदांताची मालमत्ता खरेदी करण्यासाठी कॅशलेस पर्यायाचा वापर करावा, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. या व्यवहाराने आतापर्यंत कर्जमुक्त आणि भक्कम रोख तरलता असणारी हिंदुस्थान झिंक कर्जबाजारी होऊ शकते. या वृत्ताने शेअर बाजारात हिंदुस्थान झिंकच्या शेअरला फटका बसू शकतो. यामुळे मार्केट कॅप कमी झाली तर केंद्र सरकारला निर्गुंतवणुकीवेळी मोठे आर्थिक नुकसाना सोसावे लागू शकते.  

काय आहे हिंदुस्थान झिंक- वेदांतामधील डीलचा अर्थ

  • हिंदुस्थान झिंककडून वेदांताची उपकंपनी टीएचएल झिंक व्हेंचर्स लिमिटेडचा (मॉरिशस) झिंक व्यवसाय, मालमत्ता खरेदीचा प्रस्ताव.  
  • या व्यवहारावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे.
  • हिंदुस्थान झिंकमध्ये वेदांता लिमिटेड ही सर्वात मोठी हिस्सेदार कंपनी तर केंद्र सरकारची 29.5% हिस्सेदारी.
  • वेदांताची मालकी असल्याने हिंदुस्थान झिंकने ठरवलेल्या व्यवहारावर (Related Party Transaction) सरकारचा आक्षेप
  • या व्यवहाराच्या एकूण मूल्यांकनाबाबत देखील केंद्र सरकारने प्रश्न उपस्थित केलाय.
  • या व्यवहारातील व्हॅल्यूएशन तुलनेने खूपच आहे. ज्याचा फटका हिंदुस्थान झिंकच्या शेअरला बसेल, अशी भीती सरकारला आहे.
  • उच्च मूल्यांकनाने शेअरमध्ये घसरण झाल्यास सरकारला हिंदुस्थान झिंकमधून निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करणे कठिण .
  • हिंदुस्थान झिंकच्या 9 संचालकांच्या मंडळात तीन सरकार नियुक्त संचालकांनी ‘या’ व्यवहाराला विरोध केला.
  • इतका मोठा हा संपूर्ण व्यवहार रोखीनेच होण्याबाबत केंद्र सरकारने आक्षेप घेतला.
  • यावर हिंदुस्थान झिंकचे सीईओ अरुण मिश्रा यांनी सरकार नियुक्त संचालकांचा विरोध असल्याचे मान्य केले आहे. 
  • हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळले जाईल, असे मिश्रा यांनी म्हटले आहे.
  • हिंदुस्थान झिंकने वेदांताची मालमत्ता खरेदी करण्यासाठी कॅशलेस पर्यायाचा वापर करावा, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
  • हिंदुस्थान झिंकला या प्रस्तावावर येत्या 18 महिन्यात मंजुरी घ्यावी लागणार आहे.

दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सला बसलाय फटका

हिंदुस्थान झिंककडून वेदांता लिमिटेडचा झिंक व्यवसाय 2.98 बिलियन डॉलर्सला खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचा फटका दोन्ही कंपन्यांच्या शेअरला बसला आहे. मागील महिनाभरात दोन्ही शेअरमध्ये मोठी घसरण झाली. हिंदुस्थान झिंकचा शेअर महिनाभरात 14.5% ने घसरला आहे. वेदांता लिमिटेडच्या शेअरमध्ये या डीलची घोषणा झाल्यापासून 5% घसरण झाली आहे. आज सोमवारी 20 फेब्रुवारी 2023 रोजी हिंदुस्थान झिंकचा शेअर 322.95 रुपयांवर आहे. त्यात 0.29% घसरण झाली. वेदांता लिमिटेडचा शेअर मात्र किंचित तेजीत आहे. वेदांताचा शेअर 314.95 रुपयांवर असून त्यात 0.35% वाढ झाली आहे.