Government Scheme: महाराष्ट्रातील शासकीय विद्यानिकेतन शाळांमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विद्यानिकेतन शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात 100 रुपये दिले जाते. 10 आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये प्रमाणे आणि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दरमहा 150 रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती शासकीय विद्यानिकेतन पुसेगांव (सातारा), अमरावती, औरंगाबाद आणि धुळे मधून इयत्ता 10 वी मध्ये 60 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते.
शासकीय विद्यानिकेतन पुसेगांव, अमरावती, औरंगाबाद आणि धुळे मधून प्रत्येकी 20 विद्यार्थी यासाठी पात्र ठरवले जातात. म्हणजेच दरवर्षी महाराष्ट्रातील 80 विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकतात.
Table of contents [Show]
शासकीय विद्यानिकेतन म्हणजे काय?
शासकीय विद्यानिकेतन ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण आणि माजी शालेय शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांची संकल्पना आहे. महाराष्ट्राच्या पाच महत्त्वपूर्ण विभागात निवासी विद्यानिकेतन सुरू करण्यात आली. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश देण्यात येतो. ग्रामीण भागातील मुलांना सर्वांगीण शिक्षण मिळावे, या हेतुने सुरू करण्यात आलेल्या या निकेतनातून हजारो विद्यार्थी घडले आहेत.
पात्रता काय आहे?
- शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी लाभार्थी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थ्याला दहावीच्या बोर्ड परीक्षेत 60 टक्के गुण मिळाले असावेत.
- विद्यार्थ्याने सरकारी विद्यानिकेतनमधून दहावी उत्तीर्ण केलेले असावे.
आवश्यक कागदपत्रे
- शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी दहावीची मार्कशीट असणे आवश्यक आहे.
- प्रवेशित महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अधिवास प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.
नुतनीकरण धोरण काय ?
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्याची समाधानकारक प्रगती, चांगली वर्तणूक आणि नियमित उपस्थिती असल्यास विहीत अभ्यासक्रम संपेपर्यंत घेता येईल.
नूतनीकरणा साठी विद्यार्थ्याने उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.