Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

E-20 Fuel: पेट्रोल डीझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली माहिती

Hardeep Singh Puri:

Petroleum Minister Hardeep Singh Puri: पेट्रोल-डिझेलच्यावाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक मोठी माहिती दिली आहे.

Hardeep Sing Puri on Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक मोठी माहिती दिली आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक देश असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत भारतात लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा आहे. हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, जिथे स्वस्त दरात तेल मिळेल, तिथूनच आम्ही खरेदी करणार आहोत. जागतिक बाजारपेठेचा विचार केला असता तेलाची सर्वात जास्त आयात करणारा भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे बाजारपेठेची गणिते लक्षात घेता जी कंपनी स्वस्तात तेल देईल तेथूनच तेल खरेदी करण्याचा निर्णय मंत्रालयीन पातळीवर घेतला गेला असल्याचे मंत्री म्हणाले आहेत.

Indian Energy Week अर्थात भारत ऊर्जा सप्ताहात स्वस्त दरात पेट्रोल कधी उपलब्ध होणार या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच ते म्हणाले की, भारताच्या ऊर्जा सुरक्षेसोबतच नागरिकांना स्वस्त पेट्रोल उपलब्ध व्हावे, याची काळजी घ्यावी लागेल. तसेच जागतिक ऊर्जा संक्रमणामध्ये भारताच्या भूमिकेसाठी पंतप्रधानांची दीर्घकालीन उपाययोजना सुचविल्या आहेत, त्यावर देखील आपले मंत्रालय काम करत असल्याचे ते म्हणाले.

पेट्रोलियम मंत्री पुरी म्हणाले की, देश आपल्या 85 टक्के तेलाच्या आणि 50 टक्के नैसर्गिक वायूच्या गरजा आयातीद्वारे भागवतो. त्याचबरोबर आता ऊस आणि इतर शेतीतून मिळणारे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जात आहे जेणेकरून आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर तेल आयात केले जात आहे.

हरित ऊर्जेत देश आघाडीवर 

2025 पर्यंत,तेलाबाबत इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जाईल. काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री मोदींनी E 20 Fuel च्या विक्रीला हिरवा झेंडा दाखवला. 2025 पासून सुरू होणारी ही योजना 2023 मध्येच सरकारने सुरू केली असल्याचे देखील ते म्हणाले. 2025 पर्यंत संपूर्ण भारतात E 20 इंधन लोकांना उपलब्ध करून देण्याचा संकल्प सरकारने केला आहे याची देखील त्यांनी माहिती दिली. यासोबतच हरित ऊर्जेच्या (Green Energy) क्षेत्रात देशाला पुढे नेण्याची ही एक महत्वकांक्षी योजना आहे असेही ते म्हणाले.

India Energy Week च्या उद्घाटन प्रसंगी भारत ऊर्जा क्षेत्रात वेगाने पुढे जात असल्याचे प्रधानमंत्री मोदींनी म्हटले होते. या क्षेत्रात अनेक शक्यता दिसत आहेत, असेही त्यांनी म्हटले होते. कोरोना महामारीनंतरही देशात अनेक प्रकारच्या सुविधा पाहायला मिळत आहेत.

यावर अधिक माहिती देताना, भारत सध्या विविध 39 देशांकडून तेल आयात करत आहे, असे हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. सध्या भारत तेल खरेदीच्या बाबतीत आपल्या मोठ्या बाजारपेठेचा वापर करत आहे. तेल खरेदी करताना आम्ही 'मार्केट कार्ड' वापरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासोबतच जिथे कमी दरात तेल मिळेल, तिथूनच आयात करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून तेल आयात करत होता. त्याच वेळी, 2021-22 मध्ये ही संख्या 39 पर्यंत वाढली आहे. त्यात कोलंबिया, रशिया, लिबिया, गॅबॉन आणि इक्वेटोरियल गिनी या देशांचाही समावेश आहे. यासह रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण महत्त्वाचे का आहे?

ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार इथेनॉल मिश्रण कार्यक्रमावर भर देत आहे. 2013-14 पासून देशात इथेनॉलचे उत्पादन सहा पटीने वाढले आहे. यामुळे देशाचे 54,000 कोटी रुपयांचे परकीय चलन तर वाचलेच पण CO2 उत्सर्जन (Carbon dioxide Emission) 318 लाख मेट्रिक टनांनी कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. 2014 ते 2022 पर्यंत शेतकर्‍यांना 49,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. सरकारने 2025 पर्यंत संपूर्ण देशात E-20 इंधन विक्रीस आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे साध्य करण्यासाठी, तेल विपणन कंपन्या 2G-3G इथेनॉल प्लांटची स्थापना करत आहेत.