Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol Diesel Prices: बजेटआधी स्वस्त होणार पेट्रोल डिझेल? काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री?

Union Budget 2023

Hardeep Singh Puri On Fuel Price: गेल्या 15 महिन्यांपासून देशातील तेल कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी केलेल्या नाहीत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचे आवाहन केले आहे.

वाराणसीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना हरदीप सिंग पुरी तेल कंपन्यांना विनंती करताना म्हणाले की, जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर आहेत आणि कंपन्यांची अंडर रिकव्हरी थांबली आहे, तर भारतातही तेलाच्या किमती कमी करायला हव्यात. परंतु येणाऱ्या काळात पेट्रोल-डीझेलचे भाव वाढणार नाही असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. 

कच्च्या तेलाच्या दरात लगेच कपात होणार नाही!

यासोबतच त्यांनी राज्य सरकारांनी पेट्रोलियम पदार्थांवरील व्हॅट कमी न केल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र, हरदीप सिंग पुरी यांनी अर्थसंकल्पापूर्वी किंवा नजीकच्या काळात तेलाच्या किमतीत कोणतीही कपात केली जाण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक तेल कंपन्यांचे भूतकाळातील नुकसान पाहता लवकरच पेट्रोलच्या किमती कमी होण्याची अपेक्षा नाही, असे हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना तेलाच्या किमती न वाढवल्यामुळे प्रचंड तोटा सहन करावा लागला आहे.

असे असले तरी, गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे कंपन्यांवरील दबाव कमी झाला आहे, परंतु मागील तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ झालेली असतानाही तेल कंपन्यांनी जबाबदारीने वर्तन केले आणि भरमसाठ किमती वाढवल्या नाहीत, असेही ते म्हणाले.

तेल कंपन्या 21,201 कोटींच्या तोट्यात!

पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, 'मला आशा आहे की तोटा भरून निघाल्यावर तेलाच्या किमती कमी होतील. आम्ही तेल कंपन्यांना तेलाचे दर स्थिर ठेवण्यास सांगितलेले नाही. त्यांनी स्वतः हा निर्णय घेतलेला होता. तेलाच्या किमती स्थिर ठेवल्याने या कंपन्यांना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण 21,201.18 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या नुकसानीची भरपाई अद्याप व्हायची आहे. जून 2022 अखेर तेल कंपन्यांना पेट्रोलसाठी 17.4 रुपये आणि डिझेलवर 27.2 रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी 6 एप्रिल 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली होती.