Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना : आता आधारशी लिंक होणार ही दोन प्रमाणपत्रं

सरकारी योजना : आता आधारशी लिंक होणार ही दोन प्रमाणपत्रं

Image Source : www.quora.com

देशात पॅन कार्ड आणि सरकारी योजनांना आधार कार्डला लिंक केल्यानंतर आता केंद्र सरकारने जात आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र आधारला लिंक करण्याची योजना आखली आहे.

केंद्र सरकार जात आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र आधारशी लिंक करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला जोडल्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागास जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. आधारला जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र लिंक केल्याने देशातील 60 लाख विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होऊ शकतो.

केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आधार कार्डशी जोडल्या आहेत. सरकारने पॅनकार्डला आधारशी लिंक करणेही बंधनकारक केले आहे. तसे न केल्यास पॅन कार्ड रद्द होऊ शकते. आधारकार्डला पॅन कार्ड काही मिनिटांमध्ये लिंक करू शकता. आता केंद्र सरकार जात आणि उत्पन्न प्रमाणपत्राशी आधार लिंक करण्याचा विचार करत आहे.

पात्र विद्यार्थ्यांनाच लाभ मिळणार

देशातील काही राज्यांमध्ये आधारकार्ड जात आणि उत्पन्न प्रमाणपत्राला लिंकेज करण्याची सरकारी योजना लवकरच लागू केली जाऊ शकते. या प्रक्रियेमुळे सरकारला स्वयंचलित पडताळणी प्रणाली तयार करण्यास मदत होणार आहे. जात आणि उत्पन्नाच्या दाखल्याशी आधारकार्ड लिंक केल्याने विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार असून पात्र नसलेले यातून वगळले जाणार आहेत.

60 लाख विद्यार्थ्यांना लाभ

जात आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र आधारशी लिंक करून सरकार सर्वप्रथम आर्थिकदृष्ट्या मागास जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा विचार करत आहे. याचा थेट फायदा 60 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. जात आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र आधारशी लिंक केल्यानंतर सिस्टिमद्वारे सरकारी योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारला मदत होणार आहे.

या राज्यांमधून होऊ शकते योजनेला सुरूवात 

केंद्र सरकार सर्वप्रथम राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये स्वयंचलित पडताळणी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती वाटपाचे काम सुरू करणार आहे. या राज्यांमध्ये जात आणि उत्पन्नाचे दाखले आधारशी जोडण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. आधारकार्ड आणि उत्पन्न प्रमाणपत्र लिंकेजमुळे पात्र विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळू शकते.

दहावीची शिष्यवृत्ती प्रणाली होणार डिजिटल

अनुसूचित जातीच्या मुलांसाठी दहावीनंतरची शिष्यवृत्ती प्रणाली पूर्णपणे डिजिटल करण्याची सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली. केंद्राच्या सामाजिक न्याय आणि सहाय्य मंत्रालयाने या आर्थिक वर्षातच आधारकार्ड जात आणि उत्पन्न प्रमाणपत्राला लिंकेज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांशी आधार लिंक केल्यानंतर शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्याच्या खात्यात पोहोचणार आहे.

Image Source - https://bit.ly/380YMBj