गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला अनेक लोन अॅप्स मिळतील, जे तुम्हाला काही मिनिटांत वैयक्तिक कर्ज देण्याचा दावा करतात. जेव्हा पैशांची गरज असते आणि तुम्ही कर्जासाठी अर्ज करता त्यावेळी हे अॅप्स तत्काळ तुम्हाला कर्ज प्रदान करतात, पण त्यानंतर वसुली सुरू होते. काही प्रकरणांमध्ये, तुमच्याकडून कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त पैशांची मागणी होते आणि हे कर्ज न भरल्यास तुमच्या गोपनीय माहितीचा किंवा फोटोंचा आधार घेऊन तुम्हाला ब्लॅकमेल केले जाते. ही ग्राहकांची फसवणूक लक्षात घेऊन गुगलने आता कठोर कारवाई केली आहे.
स्टिंग ऑपरेशनचा मोठा परिणाम
गुगलने आता आपल्या डेव्हलपर पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. याबद्दल नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ज्या अंतर्गत वैयक्तिक कर्ज देणारे अॅप्स फोनमध्ये प्रवेश करून तुमची माहिती मिळवू शकत नाही. यासंदर्भात काही अॅप्सवर निर्बंध लादण्यात आला आहे. गुगलने आपल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, आता ऑनलाइन कर्ज देणार्या अॅप्सना Google सोबत आरबीआयला कर्ज परवाना शेअर करावा लागेल. तसेच, नोंदणीकृत बँक / NBFC ची माहिती अॅपची माहिती या गोष्टी शेअर कराव्या लागतील. कर्ज देणारे प्लॅटफॉर्म हे फक्त अॅप असल्यास, अॅपच्या संदर्भात माहिती द्यावी लागेल.
ग्राहकांची वैयक्तिक माहिती मिळवता येणार नाही
गुगलच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता अशी कर्ज देणारी अॅप्स तुमची वैयक्तिक माहिती पाहू किंवा मिळवू शकणार नाहीत. आता हे अॅप्स तुमच्या फोनमधील फोटोज, संपर्क, लोकेशन, फोन नंबर/कॉल लॉग, व्हिडिओ इत्यादी मिळवू शकणार नाहीत. पूर्वी असे व्हायचे की हा प्रवेश दिल्याशिवाय ग्राहकांना अॅप वापरता येत नव्हते, पण आता ही समस्या समोर येणार नाही.
Source: www.zeebiz.com