Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Loan: Loan App वर कर्जासाठी अप्लाय करताय, तर सावधान!

Digital Loan App

Fake Digital Loan Apps: अॅप स्टोअरवर चीनी इंस्टंट लोन देणाऱ्या अॅपची संख्या वाढत आहे. हे अॅप लोन तर सहज मिळवून देतात, मात्र नंतर जो कर्जदाराला मनस्तापही देतात. यामुळे हैद्राबादमध्ये आतापर्यंत 52 जणांची आत्महत्या झाली आहे. जर तुम्ही अॅपद्वारे डिजिटल लोन घेण्याचा विचार करताय तर कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे ते या लेखातून जाणून घ्या.

Instant Loan Apps: सध्या फ्रॉड लोन अॅपचा (Fraud Loan Apps) सर्वच अॅप स्टोअरवर सुळसुळाट झाला आहे. यातील बहुतांश फ्रॉड अॅप हे चीनी (Chinese) आहेत. सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI - Reserve Bank of India) येत्या काळात सर्व अॅपलिकेशन्सची पडताळणी करून फ्रॉड अॅपना स्टोअरमधून हद्दपार करणार आहे. आतापर्यंत साधारण 1 हजार 100 अॅप हे बेकायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या साहय्याने व्हाईट लिस्ट जाहिर करण्यात येणार आहे. ज्यात कायदेशीर आणि सुरक्षित अॅपची यादी असेल.

बेकायदेशीर लोनअॅप्स गरजवंताना सुलभ कर्ज देण्याचे आश्वासन देऊन आमिष दाखवतात. लोन दिल्यानंतर उच्च व्याज दर, उच्च प्रक्रिया शुल्क आणि कधीकधी इतर छुपे शुल्क आकारतात. जे कर्जदार त्यांची थकबाकी वेळेवर फेडण्यात अपयशी ठरतात त्यांना मोठा दंड आणि छळाचा सामना करावा लागतो. यापैकी काही अॅप्स कर्जदारांच्या फोनमधील संपर्क आणि इतर तपशील देखील चोरतात, ज्याचा वापर ते कर्जदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी करतात. लोन अॅपने केलेल्या ब्लॅकमेलमुळे हैद्राबादमध्ये आत्तापर्यंत 52 जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अॅपद्वारे डिजिटल लोन घेण्यापूर्वी हे वाचा (Digital Loan through App) -

  • सत्यता तपासा: डिजिटल कर्ज देणाऱ्या संस्थेकडून कर्ज घेण्यापूर्वी, त्याची शहानिशा करून घ्या. अॅप आरबीआयमध्ये नोंदणीकृत आहे का ते तपासा.त्या अॅपच्या नोंदणीकृत आणि सुरक्षित वेबसाइटवर त्यांचा प्रत्यक्ष पत्ता, संपर्काचे तपशील दिलेले नसतील तर ते फसवे अॅप असण्याची शक्यता आहे. लोन अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुमच्या संपर्क, फोटो गॅलरी आणि इतर वैयक्तिक डेटाचा एक्सेस मागत असतील तर सावध राहा.
  • इंस्टंट कर्जाचा सापळा: फसव्या अॅपद्वारे इंस्टंट कर्ज देण्यात येते, त्यात कोणतीही प्रक्रिया नसते, फार काही कागदपत्रे तपासली जात नाहीत. 
    तुमच्या क्रेडेन्शियलची पडताळणी करण्यासाठी कागदपत्रे न मागणाऱ्या अ‍ॅपवरून कर्ज घेणे टाळा. तसेच, वास्तविक लोन अॅप हे कर्जदाराची परतफेड क्षमता समजून घेण्यासाठी पेमेंट हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअर पाहतात. जर अॅप कर्ज घेताना अशी कोणती माहिती घेत नसेल तर ते अॅप नक्कीच फसवे आहे. 
    मंजूर झालेल्या कर्जाची रक्कमेचे लवकर वाटप देण्याचे आश्वासान अॅप करत असताना त्यासह व्याजदर, परतफेडीचे वेळापत्रक दिले नसेल तर त्यांच्या कस्टमर सर्व्हिसला विचारावे, जर काही उत्तर आले नाही तर हे अॅप फसवे समजावे. 
    अॅपद्वारे दिलेल्या मंजुरी पत्रामध्ये बँकेचे किंवा कर्ज देणाऱ्याचे नाव असले पाहिजे आणि त्यात कर्जाची रक्कम, व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क यांचाही उल्लेख असावा. कर्ज घेण्यापूर्वी डिजिटल सावकाराने दिलेले अॅग्रीमेंट नीट वाचा आणि समजून घ्या. एखाद्या क्लॉजमध्ये गडबड असल्यास त्वरित त्यांना सांगा.
  • काही खबरदारीचे उपाय: एखादे अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्या अॅपच्या मूळ कंपनीची माहिती तपासा, कंपनीच्या नोंदणीबाबतची सर्व माहिती सर्च इंजिनवर उपलब्ध होते, तसेच RE रेग्युलेटेड एन्टीटीच्या वेबसाईटवरही उपलब्ध होऊ शकेल. 
    आपल्या मोबाईलमध्ये सिक्युरिटी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, जेणेकरून अशा अॅपमधून कोणतेही मालवेअर मोबाईलमध्ये शिरकाव करू शकणार नाही. तसेच अॅप गुगल प्ले स्टोअर, अॅपल स्टोअरसारख्या विश्वसनीय स्टोअरमधूनच डाऊनलोड करावे. 
    कर्जदार आधीच बेकायदेशीर अॅपच्या सापळ्यात अडकले आहेत आणि त्यांना वसुली एजंटांकडून त्रास दिला जात आहे, त्यांनी लगेचच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, तसेच सायबर सेलमध्ये तक्रार करावी.


तुम्हाला आपत्कालीन निधीची आवश्यकता असल्यास, बँकेकडून त्वरित वैयक्तिक कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक कर्ज एका दिवसापेक्षा कमी वेळात मंजूर होते. तर,गोल्ड लोनसारखे सुरक्षित कर्ज मिळवा. मात्र, अशा फसव्या लोन अॅपपासून सावध राहा. ही सर्व माहिती आयसीआयसीआयच्या ब्रांच डेप्युटी मॅनेजर मनिषा कान्हेरे यांनी दिली आहे.