Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google's Services in Mother Tongue: गुगल जाणीवपूर्वक स्थानिक भाषांना प्रमोट करतंय का?

Google's Services in Mother Tongue

Google's Services in Mother Tongue: एकीकडे इंटरनेटमुळे सर्व जग जवळ आले आहे; असे म्हटले जात होते. पण त्यात भाषेचा अडसर येत होता. कारण इंटरनेटवर फक्त टेक्नॉलॉजीची भाषा म्हणून इंग्रजी भाषेचाच वापर केला जात होता. पण आता भारतातील बहुतांश भाषांमध्ये गुगलच्या विविध सेवा उपलब्ध आहेत.

Google's Services in Mother Tongue: भारतात 600 दशलक्षांहून अधिक इंटरनेट युझर्स आहेत; पण त्यातील अर्ध्याहून निम्मी लोकसंख्या फक्त इंग्रजी भाषा जाणते. ऑनलाईन साईट किंवा असंख्य वेबसाईटवरील मजकूर हा बऱ्यापैकी इंग्रजीभाषेतच उपलब्ध आहे. यामुळे इंटरनेटचा वापर करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या देशातील नागरिक या भाषेच्या अडचणीमुळे काही निवडक वेबसाईटपर्यंतच पोहचत आहेत किंवा त्याचा वापर करत आहेत.

एकीकडे इंटरनेटमुळे सर्व जग जवळ आले आहे; असे म्हटले जात होते. पण त्यात भाषेचा अडसर येत होता. कारण इंटरनेटवर फक्त टेक्नॉलॉजीची भाषा म्हणून इंग्रजी भाषेचाच वापर केला जात होता. यामुळे जो परिणाम अपेक्षित होता. तो काही केल्या दिसून येत नव्हता. कारण भारताचेच उदाहरण घ्यायचे झाले तर, भारतात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या 600 दशलक्ष मिलिअन आहे. पण त्यातील इंग्रजी भाषा जाणणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे इंटरनेटवरील जग काही लोकांपर्यंत भाषेच्या अडसरामुळे पोहोचत नव्हते. अमेरिका हा देश टेक्नॉलॉजीचा वापर करणाऱ्या देशांमधील सर्वांत प्रगत देश मानला जातो. तिथल्या तरी कितीतरी कंपन्या भारतातील बाजारपेठेकडे आशा लावून बसलेल्या होत्या. कारण इंटरनेट हे असे माध्यम आहे; त्याच्या मदतीने जगातील सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य आहे. हीच गरज लक्षात घेऊन गुगलने गुगल ट्रान्सलेटर आणि गुगल ट्रान्सलिटरेशन ही दोन प्रोडक्ट बाजारात आणली आणि इंटरनेटवरील भाषेचा अडसर क्षणार्धात नाहीसा झाला.

स्थानिक भाषेत सहज वापरता येणारी गुगल टूल्स!

इंग्रजी वेबसाईटवरील मजूकर भारतीय भाषांमध्ये समजून घेण्यासाठी किंवा त्याचा अनुवाद करण्यासाठी भारतातील इंटरनेट युझर्सनी 2020 मध्ये गुगल ट्रान्सलेटरचा 17 अब्जाहून  अधिकवेळा वापर केल्याचे दिसून आले होते. स्थानिक भाषा आणि तिथले ग्राहक लक्षात घेऊन गुगलने स्थानिक भाषांना प्रोत्साहन देणारे अनेक नवनवीन फीचर्स बाजारात आणले आहेत. गुगलसारख्या अनेक मल्टीनॅशनल कंपन्या या भारताला जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ मानतात. त्यामुळे गुगलने भारतात 10 अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानुसार गुगलने आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये स्थानिक भाषांचा समावेश करून त्यात आर्टीफिशिअल इंटेलिजन्सद्वारे चांगली सेवा देण्यास सुरूवात केली.

गुगलची युट्यूब, ब्लॉग अशी काही टूल्स आहेत. ज्याचा भारतीय सराईतपणे वापर करत आहेत. या टूल्सचा किंवा प्लॅटफॉर्मचा वापर करून पैसे कमावत आहेत आणि सध्या याला मोठी मागणी आहे. गुगलच्या  स्थानिक भाषेतून तयार होणार कंटेंट, तो पाहणारे ग्राहक, तयार करणारे हे असे सर्व गुगलचे ग्राहक आहेत. गुगल वेळोवेळी हीच पॉलिसी वापरत आले आहे. सर्वप्रथम गुगलने फ्रीमध्ये जिमेल (Gmail) सेवा वापरण्याची मुभा दिली. त्यानंतर त्याचे लिमिट 15 जीबी पर्यंत मर्यादित केले. पण या प्लॅटफॉर्मद्वारे जमा होणारी माहिती ही गुगलची ही मालमत्ता आहे. गुगल याचपद्धतीने ग्राहकांना वेगवेगळ्या सेवा पुरवून त्यांना हवा आहे तो कार्यभाग साधत आहे. 

मातृभाषेत सुरू केलेल्या गुगलच्या सेवा 

गुगलने जागतिक बाजारपेठ लक्षात घेऊन मातृभाषेतून देता येतील अशा अनेक सेवा सुरू केल्या आहेत. जसे की, गुगलचे वेगवेगळे सर्च टूल्स आहेत. त्यात गुगल सर्च, गुगल अलर्ट, गुगल असिस्टंट, गुगल इमेजेस आहेत. यामध्ये वापरकर्त्याला प्रत्येक टूल्समध्ये आपल्या भाषेतून माहिती शोधण्याचा, वापरण्याचा, वाचण्याचा, लिहिण्याचा पर्याय मिळत आहे. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात घडत असलेल्या गोष्टी गुगलच्या स्थानिक भाषेतील सोयीमुळे आज सर्वांपर्यंत सहजपणे पोहचत आहेत. गुगल शॉपिंग, गुगल ट्रॅव्हल, गुगल व्हिडिओ अशा सर्व सर्च टूल्समध्ये स्थानिक भाषेचा वापर होऊ लागल्याने याचे मार्केट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. (Google services in mother tongue)

मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या सेवांचा मार्केटवर काय परिणाम झाला? 

गुगुलने अनेक प्रकारच्या सेवा मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून दिल्यामुळे जागतिक पातळीवर अनेक लहान-सहान गोष्टी स्थानिक लोकांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. यामुळे अर्थातच मल्टीनॅशनल कंपन्यांच्या प्रोडक्टची माहिती स्थानिक पातळीपर्यंत पोहचू लागली आहे. त्याचे खरेदी करण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी, त्यांचे प्रोडक्ट किमान त्या लोकांपर्यंत पोहचत आहे. ही जमेची बाजू आहे आणि हाच मार्केटवर झालेला मोठा परिणाम आहे. ग्राहकांना असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. ते ही जागतिक बाजारपेठेतून. (Impact of Mother Tongue Services on the Market)

स्थानिक भाषेतील जाणकरांना सुवर्णसंधी!

भारतातील सध्याच्या नामांकित आणि लोकप्रिय असलेल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाईट्स पाहिल्या तर स्थानिक भाषेची जाण असलेल्या तज्ज्ञांना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येते. मल्टीनॅशनल कंपन्या भारतातील लोकल लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रिजनल लॅग्वेज मॅनेजर (India Regional Language Manager), भाषा तज्ज्ञ/वरिष्ठ भाषा तज्ज्ञ (Language Expert/Sr. Language Expert), भाषांतरकार, स्थानिक भाषा बोलणारे, समजणारे, त्या भाषांमध्ये मजकूर लिहणारे यांना प्राधान्य देत आहेत.

भारताच्या अंदाजित 130 कोटी लोकसंख्येपैकी फक्त 125 दशलक्ष भारतीयांना इंग्रजी भाषा येते. तर उर्वरित भारतीय हे प्राधान्याने स्थानिक भाषांना प्राधान्य देतात. टू टिअर किंवा थ्री-टिअर शहरांतील नागरिक अजून लोकल भाषेचाच वापर करत आहेत. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटनाची ठिकाणे, अॅग्रीटेक, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी, मायक्रो-फायनान्स, हेल्थकेअर, रिटेल आणि ई-कॉमर्स या क्षेत्रांशी संबंधित उत्पादने तळागाळापर्यंत नेण्यासाठी स्थानिक भाषेतील तज्ज्ञांची गरज लागणार आहे. (job opportunities for local language speakers)