LIC Plan Update: एलआयसीने खास मुलींसाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे ‘कन्यादान योजना.’ (Kanyadaan Scheme) आता मुलींच्या भविष्याची चिंता सोडा. ही योजना तुमच्या मुलींच्या भविष्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. यासाठी तुम्ही तुमच्या बजेटनुसार या योजनेत गुंतवणूक करू शकता.
Table of contents [Show]
कन्यादान योजना काय आहे? (What is Kanyadan Scheme)
एलआयसीने मुलींच्या भविष्यासाठी ही योजना आणली आहे. खास तर प्रत्येक पालकांना आपल्या मुलींच्या लग्नाची काळजी असते. नेमकी हीच काळजी लक्षात घेऊन एलआयसीने ही योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी हा प्लॅन 121 रूपये ते 3600 रूपयांच्या मासिक प्रीमियमवर उपलब्ध आहे. जर कोणाला यापेक्षा जास्त-कमी प्रीमियर भरायला असेल तर तो देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
कशी असेल ही योजना? (How is this Scheme)
एलआयसीची कन्यादान ही योजना पालकांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही जर 22 वर्षांसाठी प्रीमियम भरला तर 25 वर्षानंतर ही योजना मॅच्युअर होऊन तुम्हाला साधारण 26 लाख रुपये देईल. म्हणजेच या योजनेत तुम्ही वेळेवर अचूक गुंतवणूक केली तर तुम्हाला मुलीच्या लग्नापर्यंत एक मोठी रक्कम उभी करता येईल.
हे खाते कोणाच्या नावावर असेल? (Whose Name will this Account be in)
एलआयसीच्या कन्यादान योजनेचे खाते हे मुलीच्या नावावर असेल. पण या खात्याचे अकाउंट होल्डर मुलीचे पालक असतील. या योजनेची मुदत 13-25 वर्षे असेल. तुम्ही तुमच्या बजेटनुसार टर्मची निवड करू सकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय 1 ते 10 वर्षे आणि वडिलांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षे असावे. तसेच मॅच्युरिटीचे कमाल वय 65 वर्षे असून, तुम्ही या योजनेअंतर्गत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक देखील प्रीमियम भरू शकता.
मॅच्युरिटीचे फायदे (Maturity Benefits)
कन्यादान योजनेअंतर्गत मॅच्युरिटीवर, विम्याच्या रकमेसह, साध्या रिव्हिजनरी बोनसचा लाभ मिळेल. याव्यतिरिक्त बोनसचाही लाभ प्राप्त होईल. तसेच तुम्ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही यावर कर्जही घेऊ शकता. प्रीमियम जमा केल्यानंतर 80C अंतर्गत डिस्काउंट मिळेल तर कलम 10D अंतर्गत मॅच्युरिटी रक्कम ही करमुक्त होईन. या योजनेसाठी विमा रकमेची मर्यादा किमान 1 लाख रुपयांपासून सुरू होते आणि यासाठी कमाल मर्यादादेखील नाही.