Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata nexon EV: टाटा मोटर्सकडून ग्राहकांसाठी खुशखबर! तब्बल 85000 रुपयांनी घटवल्या नेक्सॉन EV च्या किमती..

Tata nexon EV

Image Source : http://www.autocarindia.com/

New Nexon EV price: टाटा मोटर्सने ग्राहकांना मोठी खुशखबरी दिली आहे. New Nexon EV च्या किमती 85000 स्वस्त केल्या आहेत, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.

Tata Nexon EV Price Drop: अलीकडेच महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV XUV400 देशात लॉन्च केली आहे. यानंतर, टाटा नेक्सॉन ईव्हीला महिंद्राच्या कारकडून टक्कर दिली जाणार आहे. अशातच टाटा मोटर्सने आपल्या नेक्सॉन इलेक्ट्रिकच्या किमती बदलल्याची घोषणा (Tata Motors Announcement) केली आहे. ज्यामुळे आता ही कार 85,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. यासोबतच या कारची रेंजही वाढवण्यात आली आहे. आता Nexon EV Max ची रेंज देखील 437 किमी वरून 453 किमी प्रति चार्ज झाली आहे.

काय असणार Nexon EV Max ची नवीन किंमत? (Tata nexon EV new price)

Tata Nexon EV Max XM ची नवीन किंमत (Tata nexon EV new price)14.49 लाख रुपये झाली आहे. त्यासोबतच त्याच्या XZ + व्हेरिएंटची नवीन किंमत 15.99 लाख रुपये झाली आहे. आता त्याचे XZ + Lux व्हेरिएंट 16.99 लाख (Tata Nexon EV Variants Price) रुपये आहे.

3.3kW चार्जरसह Nexon EV Max ची एक्स-शोरूम किंमत

 16.49 लाख ते 18.49 लाख 

7.2kW चार्जरसह EV Max ची बाजारातील किंमत

 16.99 लाख ते 18.99 लाख

Nexon EV Max XM व्हेरियंटची किंमत

16.49 लाख

XZ+ व्हेरिएंटची किंमत 

17.49 लाख

XZ+ लक्स व्हेरिएंटची किंमत 

18.49 लाख

XZ+ लक्सची (7.2 kW) किंमत

19 लाख

Tata Nexon EV Max चे खास फीचर्स  Tata Nexon EV Max Features

Nexon EV Prime ला 30.2kWh बॅटरी पॅक मिळतो, जो फ्रंट-एक्सल माउंट केलेल्या इलेक्ट्रिक मोटरसह 129PS आणि 245 Nm आउटपुट करतो. यात ड्राइव्ह आणि स्पोर्ट्स सारखे ड्राइव्ह मोड मिळतात. याला प्रति चार्ज 312 किमीची रेंज मिळते. Nexon EV Max मध्ये 40.5kWh बॅटरी पॅक आहे, जे इलेक्ट्रिक मोटरसह 143PS आणि 250Nm आउटपुट देते. याला प्रति चार्ज 453 किमी टॉर्कची ARAI प्रमाणित रेंज मिळते.

किती रुपयांनी कमी झाल्यात नेक्सॉन इलेक्ट्रिकच्या (New Nexon EV price)किमती? 

Tata Motors ने नुकतीच Nexon EV च्या किमती (Tata Nexon Electric Price) 85,000 रुपयांनी कमी केल्या आहेत (Tata nexon EV price drop)आणि Nexon EV Max ची रेंज 437 km वरून 453km पर्यंत वाढवली आहे. Nexon EV प्राइम बेस व्हेरिएंट XM ची किंमत 50,000 रुपयांनी कमी झाली आहे तर XZ व्हेरिएंटची किंमत 31,000 रुपयांनी कमी झाली आहे. Nexon EV Max ला देखील सर्व प्रकारांवर  85,000 ची किंमत कमी करण्यात आली आहे.