Bachat Gat Tractor Subsidy Scheme: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या (Scheduled castes and neo-Buddhist elements) प्रगतीसाठी वैयक्तिक आणि बचत गटासाठी शासनाकडून विविध योजना चालू करण्यात आलेल्या आहे. या माध्यमातून लाभार्थी व इच्छुक वर्गाला आवश्यक त्या साधनांचे 90 टक्के अनुदानावर वाटप केले जाते. या योजनांचा लाभ घेऊन अनेक लोक आपल्या कुटुंबाचे व्यवस्थितरित्या पालन पोषण करीत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत (Department of Social Justice and Special Assistance) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने 90 टक्के अनुदानावर दिली जाणार आहे. तुम्हाला जर तुमच्या व्यवसायात वाढ करायची असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
Table of contents [Show]
बचत गट ट्रैक्टर अनुदान योजना (Bachat Gat Tractor Subsidy Scheme)
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर पावर टिलर देण्याची आधीची योजना बंद करून, त्या जागेवर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत (Bachat Gat tractor subsidy) गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने जसे कल्टीवेटर, रोटावेटर, ट्रेलर यांचा पुरवठा करण्यासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली.
कोणाला आणि काय मिळणार लाभ ? (Who and what will benefit?)
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांना.
- बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
- बचत गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील एकूण सदस्यांपैकी 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
- 9 से 18 शक्तीचा मिनी ट्रॅक्टर व सोबत ट्रॅक्टरसाठीचे सबपार्ट कल्टीवेटर, रोटावेटर, ट्रेलर (Cultivators, rotavators, trailers) इत्यादीसाठी 90 टक्के अनुदान दिले जाईल.
किती अनुदान मिळणार ? (How much subsidy will be received?)
मिनी ट्रॅक्टर व त्यांचे सबपार्ट (Mini tractors and their accessories) खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदानाअंतर्गत 3.50 लाख रक्कम खरेदीसाठी दिली जाते. म्हणजेच शासनाच्या 90 टक्के अनुदानानुसार 3.15 लाख अनुदान (grant) व लाभार्थी स्वयंहिसा 35 हजार होय.
आवश्यक कागदपत्रे (documents)
- गट नोंदणी छायांकित प्रत (Group Registration Shaded Copy)
- बचत गटाच्या बँक पासबुकची झेरॉक्स (bank passbook)
- जातीचा दाखला (Caste certificate)
- आधारकार्ड (Aadhar Card)
- रेशनकार्ड (Ration card)
- नोंदणीकृत प्रमाणपत्र (Registered certificate)
.