Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सोनं खरेदी महागणार, आजपासून इम्पोर्ट ड्युटीत 5 टक्क्यांनी वाढ

GOLD COIN

Gold Import Duty Hike : एकीकडे देशात सोनं खरेदीला जोरदार मागणी आहे; तर दुसरीकडे सरकारची वित्तीय तूटही (Fiscal Deficit) वाढत आहे. त्याचबरोबर आयात बिलात (Import Bill) सातत्याने वाढ होत असल्याने परकीय चलनाच्या गंगाजळीवरही परिणाम होत आहे.

Gold Price Today : तुम्ही जर सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सोनं खरेदी (Gold Investment) करणं आता तुमच्यासाठी महाग होणार आहे. कारण, सरकारने आजपासून म्हणजेच 1 जुलै, 2022 पासून सोन्यावरील आयात शुल्कात (Gold Import Duty Hike) 5 टक्के वाढ केली आहे. म्हणजेच आता सोनं आयात करणं हे पूर्वीपेक्षा 5 टक्क्यांनी महाग होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव किमान 1000 रुपयांच्या आसपास वाढू शकतो, असे सराफा तज्ज्ञांचे मत आहे.

आतापर्यंत सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्के इतके होते. ते आता 12.5 टक्के होणार आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने आयात शुल्कात कपात केली होती. त्यापूर्वी सोनं आणि चांदीवर 12.5 टक्के आयात शुल्क आकारले जात होते. जे 2021 च्या अर्थसंकल्पात 7.5 टक्के करण्यात आले होते.

सोन्यावरील आयात शुल्क का वाढवले?

देशात सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर दुसरीकडे सरकारची वित्तीय तूट वाढत आहे. त्याचबरोबर आयात बिलात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे परकीय चलन (Foreign Currency) साठ्यावर परिणाम झाला असून तो काही प्रमाणात खाली आला आहे; आणि सरकारसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. या पार्श्वभूमीवर सरकारने उपाययोजना म्हणून सोन्यावरील आयात शुल्कातही वाढ केली. आयात शुल्कात लगेच वाढ केल्याने सोन्याची आयात कमी होईल. दुसरीकडे मागणी अशीच राहिल्यास भाव वाढतील, असं आयआयएफएलच्या संधोधन विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अनुज गुप्ता (Anuj Gupta, Research Wing, VP, IIFL) यांचं म्हणणं आहे.

याचा परिणाम काय होईल?

आयात शुल्कात वाढ केल्याने सोन्याच्या मागणीत काही प्रमाणात घट होऊ शकते. या निर्णयामुळे सराफा व्यापारी सोनं आयात करण्याचं टाळतील. त्यामुळे आपोआप सोन्याच्या बाजारपेठेतील मागणी कमी होईल. तसेचा हा सणासुदीचा किंवा लग्नाचाही हंगाम नाही. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होईल.

शॉर्ट-टर्ममध्ये सोनं कोणत्या श्रेणीत राहील?

काल आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1810 डॉलरची पातळी तोडून खाली आला होता. काही दिवस मार्केट कन्सॉलिडेशनमध्ये राहील. आता सोन्यासाठी पुढील सपोर्ट लेव्हल पातळी 1795 आणि 1785 डॉलर ही आहे. तर MCX वर त्याची लेव्हल 50,100 च्या आसपास आहे. त्याची पुढील लेव्हल 49,700 ही असू शकेल. त्यामुळे येत्या काही काळात 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Price) 49,000 ते 52,000 रुपये या दरम्यान राहू शकतो.

सोनं किती आयात केलं जातं?

जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार (World Gold Council Report), 2021 मध्ये भारताने 55.7 अब्ज डॉलर म्हणजेच 4,141.36 अब्ज रुपयांचे सोने आयात केले होते. तर 2020 मध्ये फक्त 23 अब्ज डॉलर म्हणजेच 1,710 अब्ज रुपयांचे सोने आयात केले होते. अहवालामध्ये नमूद केल्यानुसार, 2021 मध्ये भारताने एकूण 1,050 टन सोन्याची आयात केली होती, तर 2020 मध्ये हा आकडा 430 टन होता. 2020 मध्ये कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि लग्नसमारंभांवर लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे सोन्याची आयात कमी झाली होती.

image source - https://bit.ly/3ybReFr