Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold vs Sensex : रिटर्नच्या शर्यतीत सोने सेन्सेक्सच्या पुढे

Gold vs Sensex

नवीन वर्षात सोन्याची चमक झपाट्याने वाढत आहे. परताव्याच्या बाबतीत सोन्याने सेन्सेक्सला खूप (Gold vs Sensex) मागे टाकले आहे. सेन्सेक्सने एका वर्षात केवळ 4.4 टक्के परतावा दिला आहे. तर, सोन्याने गुंतवणूकदारांना सुमारे 14 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे.

नवीन वर्षात सोन्याची चमक झपाट्याने वाढत आहे. परताव्याच्या बाबतीत सोन्याने सेन्सेक्सला खूप (Gold vs Sensex) मागे टाकले आहे. सेन्सेक्सने एका वर्षात केवळ 4.4 टक्के परतावा दिला आहे. तर, सोन्याने गुंतवणूकदारांना सुमारे 14 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे. तज्ज्ञांना पुढे आणखी वाढ अपेक्षित आहे. ते म्हणतात की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर बहुतेक देशांचा असा विश्वास वाटू लागला आहे की जगात सर्वाधिक सोने आहे. कारण, भविष्यात अन्यत्र कुठेतरी युद्ध झाले तर त्या देशाचे चलन शून्य होईल. त्यामुळे सोने हा सर्वोत्तम पर्याय आहे.

परताव्याच्या शर्यतीत सेन्सेक्स मागे 

गेल्या एक वर्षाचा विचार सोडला तरी 5 वर्षातही सेन्सेक्स परताव्याच्या बाबतीत खूपच मागे आहे. या कालावधीत सेन्सेक्सने 12.3 टक्के परतावा दिला आहे. तर सोन्याने 13.3 टक्के परतावा दिला आहे. 

सोन्यात गुंतवणूकीचा तज्ज्ञांचा सल्ला

यंदा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव 4000 डॉलर प्रति औंसवर जाण्याची चर्चा आहे.बाजार तज्ञ दलजितसिंग कोहली सांगतात की, “यावर्षी सोने खरेदी करता येईल. कारण ते तांत्रिक चार्टवर अतिशय आकर्षक दिसत आहे. त्यांनी सांगितले की अनेकदा आम्ही लोकांना सोने खरेदी न करण्याचा सल्ला देतो कारण त्यावर लाभांश मिळत नाही. दुसरे म्हणजे, ते चोरीला जाण्याची भीती असते. तिसरे म्हणजे, लॉकरमध्ये ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. पण आता असे अनेक पर्याय आले आहेत. ज्याद्वारे तुम्ही सोन्यात पैसे गुंतवू शकता.”

डिसेंबर 2023 मध्ये निफ्टीची स्थिती

त्याच वेळी, अलीकडील अहवालांमध्ये, शेअर बाजारासंदर्भात अनेक चिंता समोर आल्या आहेत. जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. मात्र, भारतातील परिस्थिती तशी वाईट नाही. दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. स्विस ब्रोकरेज फर्म यूबीएस सिक्युरिटीजने इक्विटीमधील घरगुती गुंतवणुकीतील घट, परकीय भांडवलाचा सतत प्रवाह आणि वाढत्या बँकेचे व्याजदर लक्षात घेऊन निफ्टीचे वर्षअखेरीचे लक्ष्य 18,000 पर्यंत कमी केले आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले की डिसेंबर 2023 मध्ये निफ्टीची वरची पातळी 19700 असू शकते तर खालची पातळी 15800 पॉइंट असू शकते. निफ्टी 18,000 च्या पातळीवर राहण्याची अपेक्षा आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा अंदाज आहे की या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांचा भागीदारी वाढेल आणि बाजारात नवा विक्रम पाहायला मिळू शकेल. बँकिंग, धातू आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने निफ्टी 21200 चा स्तर गाठू शकतो. बँक निफ्टी 51000 ची पातळी ओलांडू शकतो.