सोने आणि चांदीमधील तेजी नवीन आठवड्यात सुरुच आहे. आज सोमवारी 9 जानेवारी 2023 रोजी सोने आणि चांदीमध्ये वाढ झाली. मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 402 रुपयांनी वाढला. एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56144 रुपयांच्या पातळीवर गेले. (Gold Price Hits New Record Today)
जागतिक कमॉडिटी बाजारात सोने 1% महागले आहे. अमेरिकेतीत रोजगाराची आकडेवारी समाधानकारक असल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचे सत्र थांबवले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे डॉलर इंडेक्स आणि ट्रेझरी यिल्डमध्ये घसरण झाली. स्पॉट गोल्डचा भाव 1.6% ने वाढला असून तो 1863.18 डॉलर प्रती औंस इतका झाला. चांदीचा भाव 23.95 डॉलर इतका वाढला आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज दुपारी 12.30 वाजता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56144 रुपये इतका वाढला. त्यात 401 रुपयांची वाढ झाली. चांदीमध्ये देखील आज 635 रुपयांची वाढ झाली. आज एक किलो चांदीचा भाव 69790 रुपये इतका वाढला. चांदीने आज इंट्रा डेमध्ये 69831 रुपये इतका वाढला होता.
Goodreturns या वेबसाईटनुसार सराफा बाजारात आज सोमवारी सोन्याचा भाव सरासरी 300 रुपयांनी वाढला. मुंबईत 22 कॅरेटचा भाव 51300 रुपये इतका वाढला असून त्यात 300 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेटचा भाव 56290 रुपये इतका वाढला आहे. त्यात 330 रुपयांची वाढ झाली. दिल्लीत 22 कॅरेटचा भाव 51750 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 56440 रुपये इतका वाढला आहे.
चेन्नईत 22 कॅरेटचा भाव 52600 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 57380 रुपये इतका वाढला आहे. त्यात 420 रुपयांची वाढ झाली. कोलकात्यात 22 कॅरेटचा भाव 51600 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 56290 रुपये इतका वाढला आहे. त्यात 330 रुपयांची वाढ झाली.