Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Price Outlook 2023: वर्ष 2022 मध्ये सोने 14% वाढले, आणखी किती महागणार

Gold Price Outlook 2023, Gold Price

Gold Price Outlook 2023: सोन्याच्या किंमतींमधील तेजी कायम आहे. वर्ष 2022 मध्ये सोन्याच्या किंमतीत 14.30% वाढ झाली होती. वर्ष 2023 ची सोन्याचे झोकात सुरुवात केली आहे. कोरोनाचे दृष्टचक्र आणि मंदीचा वाढता प्रभाव पाहता वर्ष 2023 मध्ये सोने गुंतवणूकदारांसाठी खात्रीशीर गुंतवणूक ठरणार आहे.

सरत्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात सोने दरात मोठी वाढ झाली.सलग दहाव्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव आठवडाभरात 1.38% वाढला. आंतरराष्ट्रीय बाजारात याच कालावधीत सोने 2.36% वधारले. सोन्याचा भाव 1865 डॉलर प्रती औंस इतका झाला. वर्ष 2022 प्रमाणेच 2023 मध्ये सोने तेजीत राहण्याची शक्यता आहे.

कमॉडिटी विश्लेषकांच्या मते चीनमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, जगावरील मंदीचे सावट, फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढ आणि डॉलर इंडेक्समधील घसरण या कारणांमुळे सोन्यात तेजीचे वाढ होत आहे. नजीकच्या काळात चलन बाजारात डॉलर आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील मंदी आणि महागाई रोखण्यासाठी फेडरल रिझर्व्हचा कठोर पतधोरणाचा उपाय फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे गुंतणूकदारांसाठी सुरक्षित आणि खात्रीचा परतावा देणारी गुंतवणूक म्हणून सोनंच पुन्हा एकदा उदयास येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.वर्ष 2022 मध्ये सोन्याच्या किंमतीत 14.30% वाढ झाली होती. वर्ष 2023 ची सोन्याचे झोकात सुरुवात केली आहे. कोरोनाचे दृष्टचक्र आणि मंदीचा वाढता प्रभाव पाहता वर्ष 2023 मध्ये सोने गुंतवणूकदारांसाठी खात्रीशीर गुंतवणूक ठरणार आहे.

स्थानिक कमॉडिटी बाजाराचा विचार केला तर मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने दराला 54700 रुपयांच्या पातळीवर सपोर्ट आहे. पुढे तेजीमुळे सोने 55200 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोने 56191 रुपयांच्या सार्वकालीन उंच्चाकाला स्पर्श करु शकते असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे. महागाईची आकडेवारी, डिसेंबरमधील आर्थिक आकडेवारी, डॉलर इंडेक्स यावर सोन्याची पुढची दिशा अवलंबून असेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव येत्या काही महिन्यात 1890 ते 1910 डॉलर इतका वाढण्याची शक्यता आयआयएफएल सिक्युरिटीजचे कमॉडिटी विश्लेषक अनुज गुप्ता यांनी व्यक्त केली. सोन्याचा सध्याचा भाव पाहता सोन्यासाठी 1820 डॉलरला सपोर्ट आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने नजीकच्या काळात देशात सोन्याची मागणी वाढेल. त्यामुळे किंमतींमध्ये तेजी दिसून येईल.