Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold mutual funds: गोल्ड म्युच्युअल फंड्समधून वर्षभरात 19% परतावा; सर्वाधिक परतावा देणारे फंड कोणते पाहा

Gold mutual funds

गोल्ड म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येत आहे. मागील एक वर्षात अनेक गोल्ड फंड्सने सरासरी 19% परतावा दिल्याने गुंतवणूकदारही या पर्यायाकडे आकर्षित होत आहेत. IDBI Gold ETF या सर्व योजनांमध्ये टॉपर ठरला आहे. जेव्हा अर्थव्यवस्था कठीण काळातून जात असते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात.

गोल्ड म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येत आहे. मागील एक वर्षात अनेक गोल्ड फंड्सनी सरासरी 19% परतावा दिल्याने गुंतवणूकदारही या पर्यायाकडे आकर्षित होत आहेत. IDBI Gold ETF या सर्व योजनांमध्ये टॉपर ठरला आहे. या योजनेतून मागील एक वर्षात 20% दराने परतावा मिळाला आहे. त्यामुळे गोल्ड फंड्समधील गुंतवणूकदार चांगलेच खूश आहेत. मात्र, ही वाढ अशीच राहील का हा प्रश्न आहे. तसेच नव्याने गुंतवणूक करताना गोल्ड फंड फायद्याचे ठरतील का ते आपण या लेखात पाहू.

जेव्हा अर्थव्यवस्थेची वाईट काळातून जात असते तेव्हा सोन्याला झळाळी येते. भांडवली बाजार अस्थिर झाल्यानंतर नागरिक सूवर्ण धातूमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मागील काही दिवसांपासून वाढती महागाई, मंदीचे सावट, व्याजदरवाढ होत असल्याने सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. सोन्याची अचानक भाववाढ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2007 साली जेव्हा जागतिक मंदी आली होती तेव्हा सोन्याचे प्रति 10 गॅम दर 10,800 वरून थेट 12, 500 वर गेले होते. मागील पाच वर्षात सोन्यातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत आहे. मात्र, यापुढे चांगला परतावा मिळेलच असे नाही.

performance-of-gold-mutual-funds-in-last-one-year-1.jpg

इक्विटी आणि डेट गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत नसताना सोन्याच्या किंमती वर जात आहेत. 2022 मध्ये सोन्याचे दर 52,000 होते. एकाच वर्षात सोने 62 हजारांच्या आसपास पोहचले आहे. त्यामुळे यापुढेही सोन्याचे दर वाढतच जातील का? सांगू शकत नाही. चालू आर्थिक वर्षात जर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली. महागाई नियंत्रणात येऊन आरबीआयने व्याजदर कमी केले तर सोन्याचे भाव कमी होऊ शकतात. मात्र, अर्थव्यवस्था सुरळीत होण्यास किती कालावधी लागेल, हे नक्की सांगता येत नाही.

मागील काही वर्षात गोल्ड रेट पाहिले तर 2012 नंतर दरवाढ हळूहळू झाली. 2013 साली प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 29,000 होते. 2015 आणखी खाली येऊन 26,000 हजार रुपये झाले. 31 हजारांचा टप्पा ओलांडण्यास 2018 वर्ष ओलांडले. त्यामुळे अनेकांनी गोल्डमधील गुंतवणूक पोर्टफोलिओमधून काढून टाकली होती.

गोल्डमध्ये गुंतवणूक करावी की नाही?

जेव्हा आर्थिक संकट आलेले असते अशा वेळी सोन्यामधील गुंतवणूक फायद्याची ठरते. त्यामुळे सोन्यामधील गुंतवणुकीतून खुप जास्त नफा मिळेल अशी आशा न ठेवलेलीच बरी. कारण, फक्त काही काळ चांगला परतावा मिळू शकतो दीर्घकाळात हा परतावा चांगला असेलच असे नाही. मागील दहा वर्षांचा विचार करता गोल्ड फंडमधून सरासरी 7% परतावा मिळाला आहे. तर पंधरा वर्षात 10% दराने परतावा मिळाला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार नाही. अनेक आर्थिक सल्लागार गोल्डमधील गुंतवणूक फक्त 5 ते 10% ठेवण्याचा सल्ला देतात.