• 07 Dec, 2022 07:59

Gold and Silver Rates Today: सोनं-चांदी महागली, जाणून घ्या आजचा कमॉडिटीचा रेट

Gold and Silver Price, Gold Price Today, Silver Price

Gold and Silver Rates Today: आठवड्याचे सलग तीन दिवस सोन्याच्या किंमती कमी झाल्याचे पहायला मिळाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. चांदीची किंमतही वाढली

आज सकाळी देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवसाय सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोने-चांदीचे दर करविरहित आहेत, त्यामुळे देशातील बाजारांच्या दरात फरक दिसतो.

आजचे सोन्याचे दर (Gold Rates Today)

इंडियन बुलियन ज्वेलर असोसिएशनच्या वेबसाइटनुसार आज 24 कॅरेट सोन्याचा दर 52729 रुपये प्रति दहा ग्रॅमवर खुला झाला. मागील ट्रेडिंग डेला 52418 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोने प्रति दहा ग्रॅम 311 रुपये वाढीसह खुले झाले. मात्र, यानंतरही सोने आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून प्रति 10 ग्रॅम सुमारे 3,471 रुपयांनी स्वस्तात विकले जात आहे. आज संध्याकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोनं 52,910 प्रति 10 ग्रॅम विकलं जात होत. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सार्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोनं 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमवर गेलं होतं. तर संध्याकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,501 प्रति 10 ग्रॅम झाल्याचे पहायला मिळाले.

आजचा चांदीचा दर (Silver Rate Today)

आज चांदीचा दर आज 62379 रुपयांवर आज खुला झाला. मागील ट्रेडिंगमध्ये चांदी 61,700 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. अशात चांदीचा दर आज 679 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.  तर संध्याकाळच्या सत्रात चांदीचे दर 62,410 प्रति किलो वर पोहचल्याचे पहायला मिळाले.

एमसीएक्सवर सोने-चांदीचे भाव (Gold and Silver Rates On MCX)

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोने तेजीसह व्यापार करत आहे. डिसेंबर 2022 मध्ये सोन्याचा वायदा व्यापार 233.00 रुपयांच्या वाढीसह 52,684.00 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदीचा डिसेंबर 2022 वायदा व्यापार 585.00 रुपयांच्या वाढीसह 62,215.00 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत आहे.