सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी सोनं आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX Gold Futures) सोन्याचे वायदे 0.08 टक्क्यांनी किंवा 41 रुपयांनी वधारुन 52,759 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. त्याचप्रमाणे चांदीचा वायदा 0.18 टक्के किंवा 114 रुपयांनी वाढून 62,584 रुपये प्रति किलो झाला आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, स्पॉट मार्केटमधील सर्वाधिक शुद्धतेचे सोने सोमवारी 52,430 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले गेले, तर चांदी 61,583 रुपये प्रति किलो दराने विकली गेली. आतापर्यंत नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या स्पॉट प्राइसमध्ये एक 10 ग्रॅम सुमारे 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या स्पॉट प्राइसमध्ये एक किलो सुमारे 4200 रुपयांची वाढ झाली आहे.
अशी तपासा सोन्याची शुद्धता
‘BIS Care App’ चा वापर करुन तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. याशिवाय तुम्ही याबाबत तक्रार सुद्धा नोंदवू शकता. वस्तूचा परवाना, नोंदणी, हॉलमार्क चुकीचा आढळल्यास याबाबतची ग्राहक तात्काळ तक्रार करू शकतात.
दिवाळीत पुण्यात 100 कोटी रुपयांची सोन्याची खरेदी
मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पण यंदाच्या दिवाळीत पुणेकरांनी चक्क रांगा लावून सोनं खरेदी केलं. दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीत सोनं खरेदीला मोठा फटका बसला. पुणे, मुंबई, जळगाव या प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्याची प्रचंड विक्री झाली होती.
काही मुख्य शहरांमधील आजचे सोन्याचे दर खालीलप्रमाणे
| शहर | 22 कॅरेट/ 10 ग्रॅम | 24 कॅरेट/ | 
| दिल्ली | 48,700 | 53,110 | 
| मुंबई | 48,550 | 52,960 | 
| कोलकत्ता | 48,550 | 52,960 | 
| चेन्नई | 49,010 | 53,470 | 
| अहमदाबाद | 48,600 | 53,010   | 
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            