लग्नसराईच्या हंगामामुळे मागील काही सत्रात सोने दरात तेजी दिसून आली होती. पण आज गुरुवारी 17 नोव्हेंबर 2022 रोजी सोनं आणि चांदीच्या किंमतीत थोडं करेक्शन आलं आहे. आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 52,893 वर आला. आज सोनं 201 रुपयांनी स्वस्त झाल्याचे पहायला मिळाले. मंगळवारी संध्याकाळी सोन्याचा दर हा 53,000 रुपयांवर पोहचला होता. पण आज सोन्याचा दर पडलेला दिसला. मागील काही दिवसांत सोन्याचे भाव जसे वाढत होते त्यामुळे सोनं आपल्या आतापर्यंतच्या सर्वांत जास्त दर म्हणजेच 56,600 रुपयांपर्यंत जाईल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
सोन्याचा भाव 53,000 रुपयांपर्यंत गेला होता
काल सराफा मार्केटमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 53,094 वर बंद झाला. जर मागील 15 ते 20 दिवसांचा विचार केला तर सोन्याचे भाव हे 2,500 रुपयांनी वाढल्याचे दिसले. आज सोन्याचा भाव 52,893 रुपयांवर खुलला. सोन्याचा मागील पीक हा 56,600 रुपये होता. आता सोने आपल्या मागील पीकच्या फक्त 3,700 रुपये मागे आहे. त्यातच, 22 कॅरेट सोनं ज्यापासून ज्वेलरी बनवण्यात येते ते आज 184 रुपयांनी महाग झाल्याचे पहायला मिळाले. आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमसाठी 48,450 एवढा भाव होता.
IBJA (Indian Bullion and Jewellers Association) च्या वेबसाईटवर आज सोन्याचा भाव 52,893 रुपयांवर पोहचल्याचे दिसले. तर कालपेक्षा आज चांदी 1,294 रुपयांनी स्वस्त झाल्याचे पहायला मिळाले. आज चांदी 61,300 रुपये प्रति किलो झाल्याचे पहायला मिळाले.
धातू | 17 नोव्हेंबर | 16 नोव्हेंबर | किंमतीतील बदल |
सोनं 999 (24 कॅरेट) | 52893 | 53094 | -201 |
सोनं 995 (23 कॅरेट) | 52681 | 52881 | -200 |
सोनं 916 (22 कॅरेट) | 48450 | 48634 | -184 |
सोनं 750(18 कॅरेट) | 39670 | 39821 | -151 |
सोनं 585 (14 कॅरेट) | 30942 | 31060 | -118 |
चांदी | 613000 | 62594 | -1,294 |
लग्नांमुळे दागिन्यांची मागणी वाढली
भारतात लग्न सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. ज्वेलर्स असोसिएशनचे प्रमुख योगेश सिंघल यांनी सांगितले की लग्नांच्या मोसमामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. सोन्याची स्पॉट किंमत 1,770 डॉलरपेक्षा अधिक सुरु आहे. तर ओरिगो ई मंडीचे असिस्टंट जनरल मॅनेजर (कमोडिटी रिसर्च) तरुण तत्संगी ने सांगितले की, मागील काही दिवस सोन्याच्या किंमती मर्यादीत रेन्जमध्ये व्यवसाय करत होत्या. पण आता लग्नांचा मोसम आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये दर वाढल्याने सोन्याचे दर वाढल्याचे दिसत आहे.