Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिस्टियानो रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली कार गिफ्ट; किंमत ऐकून तुमचेही डोळे फिरतील

Cristiano Ronaldo New Car

Image Source : www.metro.co.uk

Football Player Cristiano Ronaldo: फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोला त्याच्या गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने एक आकर्षक नवीन आलिशान कार भेट म्हणून दिली आहे.

Football Player Cristiano Ronaldo: फुटबॉल खेळाडू(Football Player) क्रिस्टियानो रोनाल्डोला(Cristiano Ronaldo) त्याच्या गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज(Georgina Rodriguez) हिने एक आकर्षक नवीन आलिशान कार(Car) भेट म्हणून दिली आहे. त्याच्या या आलिशान कारमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर(Social Media) आणि सर्वत्र त्याच्या या कारची चर्चा रंगू लागली आहे. चला तर जाणून घेऊयात क्रिस्टियानोच्या या नवीन कारबद्दल.

7 कोटींची आलिशान कार 

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नव्या कारचे नाव ‘रोल्स रॉयस डॉन’ (Rolls-Royce Dawn)आहे. या नव्या कारची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. अलीकडेच, त्याच्या या कारचा व्हिडीओ समोर आला असून ज्यामध्ये जॉर्जिना रॉड्रिग्जची गिफ्टिंग कार अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.
रॉड्रिग्जने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये ती ख्रिसमसच्या निमित्ताने रोनाल्डला एक आलिशान कार भेट देतांना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रोनाल्ड अतिशय आनंदी दिसत आहे. यानंतर रोनाल्डोने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरीही शेअर करत लक्झरी गिफ्टसाठी जॉर्जिना रॉड्रिग्जचे आभार मानले आहेत.

कारची खासियत

2015 मध्ये Rolls-Royce ने जुन्या Phantom drophead coupe च्या बदली म्हणून The Dawn लाँच केली होती. ती जवळपास 7 वर्षे उत्पादनात होती. Rolls-Royce Dawn 6.6 -लीटर ट्विन-टर्बो चार्ज केलेले V12 इंजिनसह येते. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला जोडण्यात आले आहे. हे V12 इंजिन कमाल 571 PS पॉवर आणि 820 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. Rolls-Royce ने दावा केला की, डॉन 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवण्यास सक्षम असून त्याचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे.