Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Car in 2023: जाणून घ्या, नवीन वर्षात ‘या’ लक्झरी कार्स होणार लॉन्च

New Car in 2023

Upcoming New Cars: आपले 2023 मध्ये नवीन कार घेण्याचे स्वप्न असेल, तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण यावर्षी ग्लोबल ऑटो मार्केटमध्ये मोठा धुमधडाका होणार आहे. या नवीन वर्षात एक, दोन नाही तर तब्बल 5 लक्झरी कार्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. या कोणत्या कार्स आहेत, याविषयी थोडक्यात जाणून घ्या.

New Car in 2023: भारतात नवीन वर्षात 5 आलिशान गाडया लॉन्च होणार आहे. तुम्ही या कार्स तुमच्या बजेट व बॅक बॅलन्सनुसार खरेदी करू शकता. सध्या इलेक्ट्रिक गाडयांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे या आलिशान गाडयांमध्ये काही इलेक्ट्रिक कार्सचा देखील समावेश आहे. या सर्व कार्सविषयी थोडक्यात माहिती पाहूयात.

ऑडी ई-ट्रॉन (Audi A6 e-tron) 

2023 मध्ये ऑडी ई-ट्रॉन ही आलिशान कार बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. यामध्ये पॉवरफुल इंजिन 470 एचपी पॉवर असून जे 800 न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. ही ऑडी ए 6 ई-ट्रॉन प्रीमियम प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक (पीपीई) आर्किटेक्चरवर आधारित असेल. ही कार तिच्या ग्लोबल डेब्यूच्या अगदी अंतिम टप्प्यात आहे.

audi a6 e-tron
http://www.motor1.com/

मर्सिडीज ईक्यूई (Mercedes EQE)

मर्सिडीज ईक्यूई हे कंपनीचे मॉडेल जर्मनीमधील अनेक प्रमुख मॉडेलपैकी एक असण्याची शक्यता आहे. EQE SUV कारमध्ये कंपनीने 90.6kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, त्यामुळे ही कार सिंगल चार्जवर 600 किमीपर्यंतची रेंज देईल.

Mercedes EQE
http://insideevs.com/

टेस्ला सायबरट्रक (Tesla Cybertruck)

टेस्ला कंपनीने 2019 मध्ये या आलिशान गाडीचे कॉन्सेप्ट मॉडेल सादर केले होते. त्यामुळे ग्राहकदेखील या सायबरट्रकच्या प्रतिक्षेत आहेत. ही कार तीन रंग व डुअल मोटर सेटअपसह बाजारात आणणार आहे. ही लक्झरी कार आगामी वर्षात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Tesla Cybertruck
http://www.cardekho.com/

फेरारी पुरोसांग्यू एसयूव्ही (Ferrari Purosangue SUV)

या कारची ग्राहक आतुरतेने प्रतिक्षा करित आहे. ही कार सर्व फेरारीपेक्षा वेगळी असणार आहे. ही लक्झरी कार 4 सीटर एसयूव्ही आहे. यामध्ये 6.5 लीटर व्ही 12 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 715 एचपी पॉवर व 715 न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. ही कार केवळ 3.3 सेकंदात 100 किमी प्रतितास इतका वेग धारण करू शकते. या एसयूव्हीचा टॉप स्पीड 310 किमी प्रति तास इतका असणार आहे.

Ferrari Purosangue
http://www.auto.hindustantimes.com/

रोल्स रॉयस स्पेक्टर (Rolls-Royce Spectre)

जगातील सर्वात श्रीमंत असणारे ग्राहक Rolls-Royce Specter या लक्झरी कारची प्रतिक्षा करित आहेत. कारण ही कार 577hp पॉवर आणि तब्बल 900Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. ही कार केवळ 4.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास इतका वेग धारण करू शकते. यामध्ये स्लीम फ्रंट ग्रिल व स्प्लिट हेडलाईट्स मिळतील. ही कंपनीची पहिली ऑल-इलेक्ट्रिक सुपर लक्झरी सेडान आहे. 

Rolls-Royce Spectre
http://www.autotechportal.com/