Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

December Discounts Offers मध्ये कार खरेदीवर मिळवा लाखोंचा फायदा

December Discounts Offers

Image Source : www.carblogindia.com

तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर December Discounts Offer चा लाभ उठवता येईल. या माध्यमातून तुमच्या खरेदीनुसार काही हजारांपासून ते लाखोंचा फायदा मिळवू शकता. आणखी काही दिवसांसाठी ही संधी उपलब्ध राहणार आहे.

तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर December Discounts Offer चा लाभ उठवता येईल. या माध्यमातून तुमच्या खरेदीनुसार काही हजारांपासून ते लाखोंचा फायदा मिळवू शकता.  आणखी काही दिवसांसाठी ही संधी उपलब्ध राहणार आहे. 

भारतीय बाजारात ऑटोमोबाइल कंपनी रेनॉची एक स्वत:ची ओळख बनली आहे. ग्रामीण भागांपासून ते शहरी भागांपर्यंत रेनॉच्या गाड्यांचा विक्री होत असते. रेनॉने या डिसेंबर महिन्यात आपल्या कारवर 50 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. यामध्ये रोख सूट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बेनेफिट्स मिळणार आहेत. 

31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार ऑफर 

ही ऑफर्स ३१ डिसेंबरपर्यंतच उपलब्ध असणार आहे. रेनॉच्या वाहनांवर किमतीप्रमाणे वेगवेगली सूट मिळत आहे त्याप्रमाणे अन्यही कंपन्यानीही December Discounts Offer केलेली आहे. मारुती सुजुकीच्या बलेनोवर या महिन्यात 20 हजार रुपायपर्यंत डिसकाऊंट मिळत आहे. गेल्या महिन्यात ही सर्वाधिक विकली गेलेली कार होती. कंपनीने हल्लीच Baleno चे सिएनजी मॉडेल भारतात लॉच केलेले.  आहे. जे दोन व्हेरीएन्टसमध्ये येते.  Baleno ची दिल्लीमधील शोरूम प्राइज 6.49 लाख रुपये इतकी आहे. 

डिसेंबरच्या सुरुवातीला या ऑफर जाहीर करण्यात आलेल्या आहेत. काही मॉडेल्सवर तर 2 लाख 50 हजारांपर्यंत डिसकाऊंट मिळत आहे. December Discounts Offers मध्ये टॉप मॉडेल खरेदी करण्यात जास्त फायदा मानला जातो. कारण यावर जास्त डिसकाऊंट मिळतो. 

डिसेंबरमध्ये का मिळतात स्वस्त कार? 

सामान्यत: डिसेंबरमध्ये बहुतेक  कार कंपन्या आपले  प्रोडक्शन थांबवतात. कारण या महिन्यात एखादी कार आली तर जानेवारीमध्ये टेक्निकली ती गेल्या वर्षीची कार बनते. यामुळे ग्राहकांकडून त्याची खरेदी टाळली जाते. यामुळे या कालावधीत स्टॉक खाली करण्याकडे कंपन्यांचा कल असतो. स्टॉक खाली करण्यामध्ये ग्राहकांचा फायदा होत असतो. त्यांना लाखो रुपयांची सूट मिळवता येते. 

कारच्या किमती या जास्त असतात. यामुळे डिसकाऊंटमुळे आपल्या बजेटमध्ये एखादे मॉडेल येऊ शकते.  खर्च कमी होऊ शकतो. यामुळे नजीकच्या काळात कार घेण्याचे नियोजन असेल तर याकडे एक चांगली संधी म्हणूनही बघितले जाऊ शकते.