Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Poultry Farm Loan: पोल्ट्री सुरु करण्यासाठी 50 लाखापर्यंतचे कर्ज तेही 50% सबसिडीवर, जाणून घ्या प्रोसिजर

Poultry Farm

Image Source : www.thehindu.com

Poultry Farm Loan: ग्रामीण भागातील अनेकांना शेतीसोबतच जोडधंदा करण्याची इच्छा असते. पण अनेकदा शेतीतील उत्पन्न कमी झाल्याने ते राहून जातं. सरकारकडून अनेक व्यवसायांसाठी मदत दिली जाते. ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या सबसिडीसह 50 लाखापर्यंतचे कर्ज देत आहेत.

Poultry Farm Loan: ग्रामीण भागातील अनेकांना शेतीसोबतच जोडधंदा करण्याची इच्छा असते. पण अनेकदा शेतीतील उत्पन्न कमी झाल्याने ते राहून जातं. सरकारकडून अनेक व्यवसायांसाठी मदत दिली जाते. ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या सबसिडीसह 50 लाखापर्यंतचे कर्ज देत आहेत. ही एक योजना आहे.  केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याअंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशू कार्यक्रम राबविला जात आहे. 

मांस, दूध आणि अंडी यांचे उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. 2022-23 या वर्षामध्ये भारतात 129 अब्ज अंड्याचे उत्पादन झाले. भारताची लोकसंख्या पाहता आता अंड्याला प्रचंड मागणी आहे. म्हणून ही योजना राबविली जात आहे. या योजनेतून ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म उभरण्यासाठी सरकारकडून 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल ज्यावर 50 टक्के सबसिडी सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही 50 लाखांचे कर्ज घेतले तर तुम्हाला त्यातील 50 टक्के म्हणजे 25 लाख रुपयेच परत करावे लागणार आहे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.

यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? 

  • सविस्तर प्रकल्प अहवाल
  • आधार कार्ड
  • जागेचे फोटो 
  • जमिनीची कागदपत्रे 
  • पॅन कार्ड
  • ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • आवश्यक फॉर्म
  • जात प्रमाणपत्र
  • कौशल्य प्रमाणपत्रं
  • स्कॅन सही

ही सर्व कागदपत्रे जमवल्यानंतर नॅशनल लाईव्हस्टॉक पोर्टलवर जाऊन आपला यूझर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला उदयमी मित्र पोर्टलला भेट द्यावी. याच पोर्टलवरून तुम्ही अर्ज करु शकता. 

कर्ज कोणाला मिळू शकते? 

बचत गट, उद्योजक, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी कायद्याच्या कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था या पैकी सर्व जण या कर्जाचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमार्फत कोणतीही नॅशनल बँक कर्ज देण्यास मंजूरी देते.

योजनेसाठी आवश्यक बाबी कोणत्या? 

  • कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर 1 एकर जमीन असायला पाहिजे. 
  • जमिनी संबंधित कागदपत्रं अर्जासोबत जोडली असायला पाहिजे. 
  • पोल्ट्री फार्मचा प्रकल्प आराखडा सादर करणे आवश्यक आहे. 
  • प्रकल्पामध्ये सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. 
  • अर्जासोबत दिलेली माहिती सर्व खरी असावी. 
  • खोटी आढळल्यास अर्ज रद्द केला जातो. 

या कर्जासाठी कोणाला संपर्क करू शकता?

ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकारची नोडल एजन्सी असणार आहे. ऑनलाईन जरी अर्ज केल्यानंतरही तुमचे अर्ज याच एजन्सीव्दारे बँकांपर्यंत पोहचवले जातील. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याशी कॉनटॅक्ट करून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांची मदत मागू शकता.