Women Business Loan: महिलांचा नोकरी, व्यवसायातील टक्का वाढत आहे. एखाद्या महिलेनं व्यवसाय सुरू करणं आणि सांभाळणं हे मागील काही दशकांत महाकठीण काम होतं. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. अनेक महिला स्टार्टअप आयडीया घेऊन बाजारात उतरत आहेत. त्यांना आर्थिक बळ देण्याकरिता पुनावाला फिनकॉर्पकडून खास महिला उद्योजिकांना व्यावसायिक कर्ज देण्यात येत आहे. काय आहे ही ऑफर पाहूया.
वित्त पुरवठा क्षेत्रात पुनावाला फिनकॉर्प ही आघाडीची कंपनी आहे. या कंपनीकडून लहान आणि मध्यम स्वरुपाचा व्यवसाय करणाऱ्या महिला उद्योजिकांना व्यावसायिक कर्ज पुरवठा करण्यात येतो. विनातारण कर्ज असल्याने कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मिळू शकते. त्यासाठी काय अटी आहेत वाचा.
महिला उद्योजिकांसाठी व्यावसायिक कर्ज योजना
महिलेचे वय 24 ते 64 दरम्यान असावे.
व्यवसायास कमीतकमी 2 वर्ष पूर्ण झालेले असावेत.
व्यवसायाची वार्षिक उलाढाल 6 लाखांपेक्षा जास्त असावी.
15 टक्क्यांपासून पुढे व्याजदर आकारला जाईल.
50 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.
कर्जफेडीचा कालावधी 6 - 36 महिने असेल.
विनातारण कर्ज मिळण्याची सुविधा
कर्जासाठी अर्ज करताना KYC कागदपत्रे, व्यवसायासंबंधित कागदपत्रे आणि व्यवसायाच्या आर्थिक उलाढालीसंबंधीची कागदपत्रे लागतील.
कोणत्या कारणांसाठी कर्जासाठी अर्ज करू शकता?
महिला उद्योजिका विविध कारणांसाठी व्यवसायिक कर्ज घेऊ शकतात. व्यवसाय वाढवण्यासाठी, नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी, मशिनरी, सॉफ्टवेअर, सेटअप बसवण्यासाठी, कर्मचारी भरती, भांडवली खर्च भागवण्यासाठी कर्ज मिळू शकते. महिलांसाठी कमी व्याजदर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. इतर नियम आणि कागदपत्रांची माहिती या लिंकवर पाहायला मिळेल.
कर्ज मिळवण्याची प्रक्रिया कशी असेल?
महिला उद्योजिका व्यावसायिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज करताना वैयक्तिक आणि व्यवसायासंबंधी माहिती भरावी लागेल.
अर्ज जमा केल्यानंतर कंपनीकडून अर्जाची तपासणी केली जाईल. तसेच कंपनीकडून संपर्क साधला जाईल. या लिंकद्वारे तुम्ही ऑनलाइन अप्लाय करू शकता.