एखादा नवा बिजनेस सुरू करायच्याआधी सध्या आपली परिस्थिती कशी आहे. याची समज आपल्याला असणं गरजेचं आहे. तुमच्याजवळ संपत्ती किती आहे? तुमच्यावर किती देणी बाकी आहेत? यामध्ये तुमच्या सर्व संपत्तीचा समावेश असायला पाहिजे जसे की, जमीनीच्या नोंदी, तुमच्यावर असलेलं कर्ज किंवा लिक्विड मालमत्ता. यांची यादी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे या गोष्टींचं महत्व तुम्ही समजून घ्यायला हवं. ते समजल्यावर तुम्ही बाकीच्या गोष्टी सहज करू शकता.
Table of contents [Show]
मालमत्तेचा मार्केट दर
वर सांगितल्यानुसार, तुमच्याजवळ बऱ्यापैकी मालमत्ता असल्यास, तिचा सध्याचा बाजार दर काढणं महत्वाचं ठरेल. कारण, हीच एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला या भानगडीतून वर काढू शकते. म्हणजे, या मालमत्तेचा उपयोग तुम्ही लोन घेण्यासाठी करू शकता. त्यामुळे तुमच्या जवळच्या बॅंकामध्ये जावून तुम्ही लोन मिळण्याविषयी त्यांना विचारणा करू शकता.
बिझनेसचा आराखडा बनवा
जर तुम्हाला बिझनेससाठी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त लोन पाहिजे असल्यास, तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही जेथून लोन घेणार आहात त्यांना दाखवावा लागणार आहे. यात तुमच्या बिझनेसविषयी सर्व माहिती असायला पाहिजे. विशेष म्हणजे आर्थिक बाबींविषयी ठळक मांडणी प्रोजेक्टमध्ये असणं आवश्यक आहे.
क्रेडिट स्कोअर चांगला हवा
तुमचा क्रेडिट स्कोअर उत्तम असल्यास तुम्हाला त्वरित लोन मिळण्याची संधी वाढू शकते. ते करण्यासाठी तुमच्यावर काही लोन असल्यास ते फेडावे लागेल. तसेच, भविष्यात लोन घेत असल्यास तेही न चुकता वेळेवर फेडावे लागेल, असे केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहू शकतो.
लोन घेण्यासाठी मार्केट सर्च आवश्यक
लोनसाठी तुम्ही सार्वजिनक बॅंकासह इतर बॅंकेकडून लोन घेवू शकता. त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये कुठे योग्य दरात लोन मिळू शकते यासाठी सर्च करावा लागेल. कारण, त्यांच्या काही नियम व अटी असू शकतात त्यांची पाहणी तुम्हाला बारकाईने करावी लागेल. यासाठी तुम्हाला मार्केट सर्च करणं आवश्यक आहे.
लोन मिळवण्याची तयारी
तुम्ही बिझनेसचा आराखडा बनवला असल्यास आणि लोनसाठी योग्य बॅंक पाहून झाल्यास. तुम्ही लोनसाठी त्या बॅंकेकडे जावू शकता. पण, जाण्याच्याआधी सर्व पेपर्स आणि बिझनेसविषयी त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तुम्हाला तयार रहावे लागणार आहे. येथे एकही चूक तुमची शक्यता कमी करू शकते. त्यामुळे सर्व बाबींची पूर्ण माहिती घेवूनच तुम्ही बॅंकेकडे लोन घेण्यासाठी जावू शकता.