आज महाराष्ट्रात अनेक जाती-जमाती हालाखीचे जीवन जगत आहेत. दारिद्र्यरेषेखाली मोडणारा वर्ग आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. नोकरी नाही, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा तर पुरेसे भांडवल नाही. अशा मातंग समाजातील एकूण बारा पोट जातीतील घटकांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत सुरूवातीला 25 हजार रुपये इतके कर्ज दिले जात होते. आता या कर्जाच्या रकमेत वाढ करून ते 1 लाखापर्यंत करण्यात आले आहे. यातील 85 टक्के रक्कम संबंधित व्यक्तीस अनुदान म्हणून प्रदान केली जाते. तर उरलेली 15% रक्कम ही त्या व्यक्तीस भरावी लागते. अशी एकूण एक लाख रुपये इतकी रक्कम या योजनेअंतर्गत दिली जाते. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजने अंतर्गत मिळालेले कर्ज फेडण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी दिला जातो. यादरम्यान कर्जदाराकडून 3 ते 4 टक्के व्याजदर आकारले जाते.
अटी व नियम
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील राहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत मातंग तसेच 12 पोट जातींमधील तरुणांना रोजगार सुरू करण्यासाठी कर्ज.
- ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि राज्य पातळीवर क्रीडा पुरस्कार प्राप्त तरुणांना विशेष प्राधान्य.
- सैन्य दलात वीरमरण पावलेल्या सैनिकांच्या वारसांना कर्जासाठी विशेष प्राधान्य.
- या योजनेअंतर्गत महिलांना 50 टक्के तर पुरुषांना 50 टक्के आरक्षण राखीव ठेवले जाईल.
- या योजनेमध्ये वयाची अट किमान 18 ते 50 वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
- योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा अधिक नसावे.
- एका परिवारातील एकाच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
योजनेचा लाभ कोणाला
- मातंग
- मांग
- गारुडी
- मदारी
- मांग गोराडी
- मांग महाशी
- मादगी मादिगा
- मिनी मादिग
- दानखणी मांग
- राधे मांग
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड .
- अर्जदाराचे बँक खाते पासबुक.
- अर्जदार तरुणाची जात प्रमाणपत्र .
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र .
- अर्जदार याआधी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये याचा पुरावा.
- दोन पासपोर्ट साईज फोटो.
- अर्जदार व्यक्तीचा शाळेचा दाखला .
- उद्योग व्यवसाय सुरू करत असलेल्या जागेचा पुरावा म्हणून करार पत्र किंवा भाडेपावती .
- शॉप ॲक्ट लायसन्स .
- ग्रामसेवकाकडून मिळाले व्यवसाय करण्यासंबंधीचे ना हरकत सर्टिफिकेट.
- व्यवसाय संदर्भातील साहित्य तसेच मालक खरेदीचे कोटेशन व दर पत्रक.
- अर्जदाराचा सिबिल स्कोर 500 पेक्षा अधिक असावा आणि ज्या व्यवसायाकरिता अर्ज करत आहे; त्याचे प्राथमिक ज्ञान असावे .